पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 8:34AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असून, त्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमुळे ते विशेषतः लक्षात राहतील, असे म्हटले.
त्यांनी 'एक्स'वरील एका संदेशामध्ये लिहिले,
"प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने मन अतिशय दुःखी झाले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांची देशभक्ती त्यांच्या चित्रपटांमधूनही प्रकट होत असे. मनोज जींच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागवली आणि त्या पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरतील. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आणि सर्व चाहत्यांबरोबर आहेत. ॐ शांती."
***
SonaT/Raj/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2118659)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam