माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप आणि वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा
क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाणार
Posted On:
01 APR 2025 7:52PM by PIB Mumbai
मुंबई/भोपाळ, 1 एप्रिल 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय सोबतच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत इंडियन कॉमिक्स असोसिएशन तसेच वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय अॅनिमेटेड फिल्म असोसिएशन – असिफा इंडियाच्या वतीने आज वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा केली गेली. आज भोपाळ इथे आयोजित एका समारंभात ही घोषणा केली गेली. मुंबईत येत्या 1 ते 4 मे, 2025 या कालावधीत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual and Entertainment Summit - WAVES) अर्थात वेव्हज परिषदेमध्ये या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भोपाळ इथल्या पत्र सूचना कार्यालयाचे अपर महासंचालक प्रशांत पाठराबे यांनी माध्यम प्रतिनिधीसोबत संवाद साधला आणि त्यांना वेव्हजविषयी सविस्तर माहिती दिली. वेव्हज परिषद हा एक महत्त्वाचा उपक्रम असून, हा उपक्रम व्यावसायिक उद्योजक, गुंतवणूकदार, निर्माते आणि नवोन्मेषकांना मनोरंजन क्षेत्रासोबत जोडले जाण्यासाठी, सहकार्यपूर्ण प्रकल्पांसाठी करण्यासाठी तसेच नवसंकल्पना साकारण्यासाठी तसेच या क्षेत्रात आपले योगदान देण्यासाठी एक उत्कृष्ट जागतिक मंच म्हणून उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले. ही परिषद आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तंत्रज्ञानाधारीत नवोन्मेषी संकल्पनांचे केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करेल असे त्यांनी सांगितले.

वेव्ह्ज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप आणि वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या घोषणा समारंभालाही भोपाळ इथल्या पत्र सूचना कार्यालयाचे अपर महासंचालक प्रशांत पाठराबे यांनी संबोधित केले.
इंडियन कॉमिक्स असोसिएशन (ICA) चे अध्यक्ष अजितेश शर्मा यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वेव्ह्ज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा करताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर इंडियन कॉमिक्स असोसिएशनने अंतिम फेरीसाठी 10 संघांची निवड केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड त्यांच्या सर्जनशील कथा, कलात्मक कौशल्य आणि एकूण प्रभावाच्या आधारे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय कॉमिक्सला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे आणि नवोदित प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच या चॅम्पियनशिपचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेसाठी आलेल्या कलाकृती अपवादात्मक गुणवत्तेच्या असल्याचे ते म्हणाले. अंतिम फेरीतील स्पर्धक भारतीय कॉमिक्सला नवीन उंचीवर नेतील यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

वेव्ह्ज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपसाठी आलेल्या कलाकृतींचे परीक्षण पाच सदस्यीय परीक्षक मंडळाने केले. यात प्रसिद्ध कॉमिक कलाकार आणि चित्रकार दिलीप कदम, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांचे सुपुत्र आणि स्वतः नामांकित कॉमिक्स कला निर्माते असलेले निखिल प्राण, द बीस्ट लीजन या वेब मंगाचे कला निर्माते जैझील होमावजीर, राज कॉमिक्सचे संस्थापक संजय गुप्ता, अमर चित्र कथाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती व्यास यांचा समावेश होता. सिनेमिक्स अँड कीप रोलिंग फिल्म्सच्या संचालिका आणि इंडियन कॉमिक्स असोसिएशनच्या सदस्य शिल्पा शर्मा या कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपच्या मुख्य समन्वयक आहेत.
वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची माहिती खाली दिली आहे:
व्यावसायिक श्रेणी:
1. मोहित शर्मा (मेरठ) - आयुष कुमार (दिल्ली)
2. अपर्णा चौरसिया (छतरपुर)
3. बिजॉय रवीन्द्रन (दिल्ली) - ताडम ग्यादु (दिल्ली)
4. पुनीत शुक्ला (गोरखपुर) - पीयूष कुमार (रांची)
5. तेजस जनार्दन कांबळे (मुंबई)
बिगर व्यावसायिक श्रेणी:
1. सुवोजीत पाल (हावड़ा) - विवेक प्रधान (रायपुर)
2. विन्ध्यर्ष मिश्र (बरेली)
3. रोहित शुक्ला (चेन्नई) - शिवांगी शैली (इंदौर)
4. रितेश पात्रा (कोलकाता)
5. रणदीप सिंह (केंद्रपाड़ा)
असिफा इंडियाने केली वेव्ह्ज उत्कृष्टता पुरस्कारांची घोषणा
ॲनिमेशन आणि आशय निर्मात्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, युनेस्कोची मान्यता प्राप्त झालेल्या असिफा (आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड फिल्म असोसिएशन") या जागतिक बिगर सरकारी संघटनेच्या भारतातील कार्यालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने, क्रिएट इन इंडिया चॅलेंजच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वेव्ह्ज उत्कृष्टता पुरस्कारांची आज भोपाळ येथे घोषणा केली. या स्पर्धेसाठी 10 विविध श्रेणींमधील विद्यार्थी आणि व्यावसायिकांची निर्मिती असलेल्या 1 हजार 331 कलाकृतींची नोंद झाली असून असिफा इंडियाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे, असे असिफा इंडियाचे अध्यक्ष संजय खिमेसरा यांनी सांगितले. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ज्युरी सदस्यांनी या कलाकृतींची समीक्षा केल्यानंतर, असिफाने भारतातील 28 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि इतर 13 देशांमधून सादर झालेल्या 1,331 प्रवेशिकांपैकी अव्वल 46 नामांकनांची निवड केली आहे.

असिफा इंडियाचे अध्यक्ष, संजय खिमेसरा, वेव्स कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप आणि वेव्ह्स उत्कृष्टता पुरस्कारांमधील अंतिम स्पर्धकांची नावे जाहीर करण्यासाठी आयोजित समारंभाला संबोधित करताना
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जागतिक स्तरावरील 63 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. हे पुरस्कार 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज 2025 मध्ये प्रदान केले जातील. विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठीच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कॅरेक्टर ॲनिमेशन, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट लघुपट अशा श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या 'क्रिएट इन इंडिया' उपक्रमाच्या अनुषंगाने भारताच्या सर्जनशील क्रांतीचा भाग म्हणून विजेत्यांना मार्गदर्शन, उद्योगजगतातील आघाडीच्या नेत्यांसोबत नेटवर्किंगच्या संधी आणि मान्यता मिळेल. यातील कलाकृतींना वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रसारित केल्यामुळे स्पेन, ब्रिटन , अमेरिका, ग्रीस, सायप्रस, इराण, फिनलँड, फिलीपिन्स, जर्मनी, श्रीलंका, पोर्तो रिको, चीन आणि मेक्सिको या 13 देशांमधील 63 पेक्षा जास्त कलाकृतीं प्राप्त झाल्या आहेत . जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशील नेतृत्वाला अधिक बळकट करण्यासाठी, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) मधील अपवादात्मक कामगिरी जगासमोर सादर करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
असिफा इंडियाने गेल्या 9 महिन्यांमध्ये भारतातील 15 शहरांमध्ये सीजी मीटअप, आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिवस यासारख्या प्रमुख कार्यक्रमांसह वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमात पुणे, इंदूर, नाशिक, मुंबई, नोएडा, बेंगळुरू तसेच इतर ठिकाणी विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन समाविष्ट आहे. प्रवेशिकांचे मूल्यांकन करणाऱ्या पाच सदस्यांच्या ज्युरीमध्ये अथेन्स, ग्रीस येथील डॉ. अनास्तासिया दिमित्रा (शिक्षक आणि उपाध्यक्ष, असिफा इंटरनॅशनल), अमेरिकेतील ब्रियाना यारहाऊस (संचालक, उत्कृष्टता पुरस्कार आणि प्राध्यापक), अमेरिकेतील प्रमिता मुखर्जी (वरिष्ठ क्रिएटर एफएक्स डेव्हलपर, ड्रीमवर्क्स), धिमंत व्यास (प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, आयडीसी स्कूल ऑफ डिझाइन) आणि बी.एन. कल्पना (कला दिग्दर्शक, टेक्निकलर गेम्स)या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश होता.
व्यावसायिक श्रेणीतील अव्वल 20 नामांकित कामांमध्ये व्यावसायिकांनी पाठवलेले जाहिरातपट/लघुपट समाविष्ट आहेत. या व्यावसायिकांमध्ये अव्वल भारतीय स्टुडिओ, व्यावसायिक तसेच जर्मनी, चीन आणि अमेरिकेतील जागतिक प्रवेशिकांचा समावेश आहे.
व्यावसायिक श्रेणीत निवडलेली नावे
1
|
Patrick
|
Smith
|
ASIFA24102
|
Onward Ye Costumed Souls
|
USA
|
2
|
Fabian
|
Driehorst
|
ASIFA24142
|
Little Fan
|
Germany
|
3
|
Yingyan Chen
|
Linxiao Zhou, Zehao Chen
|
ASIFA24205
|
Online interview
|
China
|
4
|
Long Qin
|
CHINA
|
ASIFA24207
|
IN BEWTEEN
|
China
|
5
|
Suresh
|
Eriyat
|
ASIFA24298
|
The Seed
|
Mumbai, India
|
6
|
Adithi
|
Krishnadas
|
ASIFA24299
|
The Legend of Arana
|
Mumbai, India
|
7
|
Suresh
|
Eriyat
|
ASIFA24302
|
Pune Design Festival Versus Ident Film
|
Mumbai, India
|
8
|
Swati
|
Agarwal
|
ASIFA24654
|
Chalisa'
|
Mumbai, India
|
9
|
Swathy
|
Pushpalochanan
|
ASIFA24678
|
Anpu
|
Kollam, Kerala
|
10
|
Bimal
|
Poddar
|
ASIFA24693
|
IPL opening graphics
|
Mumbai, India
|
11
|
Bimal
|
Poddar
|
ASIFA24694
|
Home season opening graphics/Legend
|
Mumbai, India
|
12
|
Bimal
|
Poddar
|
ASIFA24696
|
RADHA
|
Mumbai, India
|
13
|
Bimal
|
Poddar
|
ASIFA24697
|
13th Portal
|
Mumbai, India
|
14
|
Bimal
|
Poddar
|
ASIFA24698
|
More kaka
|
Mumbai, India
|
15
|
Prateek
|
Sethi
|
ASIFA24726
|
Informa Markets In India - Milan
|
Mumbai, India
|
16
|
Ujwal
|
Nair
|
ASIFA24740
|
Lucky Dog
|
Chennai, India
|
17
|
Gary
|
Schwartz
|
ASIFA2492
|
FLINTMATION ll
|
USA
|
18
|
David
|
Ehrlich
|
ASIFA2494
|
A New World
|
USA
|
19
|
Suresh
|
Eriyat
|
ASIFA251377
|
Desi Oon
|
Mumbai, India
|
20
|
Amit
|
Sonawane
|
ASIFA251402
|
What's Your Story
|
Mumbai, India
|
नामांकन प्राप्त अव्वल 26 कलाकृतींमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, चंदीगड, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, नवी दिल्ली यासह देशभरातील विद्यार्थ्यांच्या शोरील/शॉर्ट्सचा समावेश आहे.
विद्यार्थी श्रेणीतील निवडक नावे
S.No
|
First Name
|
Last Name
|
Tracking Number
|
Project Title
|
Location
|
1
|
Varun
|
Choudhry
|
ASIFA24942
|
Varun Choudhry | Modeling Reel 2024
|
Mumbai
|
2
|
Hussain
|
Bohra
|
ASIFA24744
|
IRAN 600 BC
|
Udaipur
|
3
|
Shavikant
|
Chauhan
|
ASIFA24474
|
texturing showreel
|
Surat
|
4
|
Karan
|
Meghlan
|
ASIFA24930
|
Karan_Malghan_Modeling_Texturing_Reel_Wave
|
Pune
|
5
|
Rajat
|
Aingh
|
ASIFA241036
|
CG Lighting Showreel_Rajat Singh
|
Chandigarh
|
6
|
Ajit Tanaji
|
Kinare
|
ASIFA24881
|
CG Lighting
|
Mumbai
|
7
|
Ankan
|
Samanta
|
ASIFA24850
|
Rigging Showreel By Ankan Samanta
|
Hooghly, WB
|
8
|
Sumedha
|
Paul
|
ASIFA24814
|
Rigging Showreel
|
Kolkata
|
9
|
Arjun
|
kumar
|
ASIFA24157
|
Animation Showreel
|
Chandigarh
|
10
|
Arpit
|
Thakur
|
ASIFA24948
|
Animation Showreel By ARPIT THAKUR
|
Chandigarh
|
11
|
Kumkum
|
Gupta
|
ASIFA24966
|
Digital_Painting_Kumkum Gupta
|
Mumbai
|
12
|
Ishwari
|
Tarkar
|
ASIFA24969
|
Digital_Painting_Ishwari_Tarkar
|
Mumbai
|
13
|
Tarun
|
None
|
ASIFA24800
|
Digital Matte Painting
|
Bengaluru
|
14
|
Arena
|
Andheri
|
ASIFA241073
|
Matte Paint-Sameer Parab
|
Mumbai
|
15
|
ElangoM
|
Elango
|
ASIFA241306
|
Digital matte painting
|
Bengaluru
|
16
|
Prajval
|
Nanote
|
ASIFA241005
|
Motion graphic
|
sausar
Chhindwara,MP
|
17
|
Sk
|
Nur Islam
|
ASIFA241121
|
Motion Graphics Showreel
|
Malda, WB
|
18
|
Sourav
|
Bishwakarma
|
ASIFA241202
|
Compositing Showreel
|
Kanchrapara,WB
|
19
|
Varun
|
Sapkal
|
ASIFA24565
|
Showreel Varun Sapkal VFX
|
Mumbai
|
20
|
Vijay
|
Bangar
|
ASIFA24922
|
Kothrud_Vijay_Bangar
|
Kothrud, Pune
|
21
|
Shaikh
|
Sahil
|
ASIFA241176
|
Avengers: Infinity War movie Shots
|
Mankhurd, Mumbai
|
22
|
Aditi
|
Dixit
|
ASIFA251357
|
Showreel
|
Delhi
|
23
|
Rutvik
|
Dhole
|
ASIFA24736
|
Arwick 2d Animated explainer Video Ad
|
Not specified
|
24
|
Debopom
|
Chakraborty
|
ASIFA24661
|
Rasmalai
|
Gurgaon, Haryana
|
25
|
Kartik
|
Mahajan
|
ASIFA24731
|
Phool Dei
|
Dehradun, Utta
|
26
|
Harshita
|
Nehlani
|
ASIFA251352
|
Adhoori Pehchaan [Incomplete Identity]
|
GLS, A’bad
|
भारतातील सर्वात मोठ्या कॉस्प्ले चॅम्पियनशिपचे आयोजन
एमईएआय (मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया), आयसीए (इंडियन कॉमिक्स असोसिएशन) आणि क्रिएटर्स स्ट्रीट यांनी तेलंगणा सरकार, तेलंगणा VFX ॲनिमेशन अँड गेमिंग असोसिएशन (TWGA) आणि फॉरबिडन व्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एपिको कॉनद्वारे समर्थित वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप - भारतातील सर्वात प्रतिष्ठित कॉस्प्ले स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1-4 मे 2025 दरम्यान मुंबईतील वेव्हज 2025 (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट) येथे होणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम भारतातील सर्वात प्रतिभावान कॉस्प्लेअर्सना एकत्र आणून पॉप संस्कृतीच्या जगातील त्यांची कलात्मकता, समर्पण आणि शिल्पकारी यांचा उत्सव साजरा करेल.
वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपविषयी
वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपचे उद्दिष्ट भारतातील वाढत्या कॉस्प्ले समुदायाला सक्षम बनवणे आहे, ज्यामुळे सहभागींना त्यांचे कौशल्य, सर्जनशीलता आणि पॉप संस्कृतीबद्दलची आवड दाखवण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होईल. ही स्पर्धा भारतातील वाढत्या मनोरंजन आणि एवीजीसी-एक्सआर क्षेत्राच्या अनुषंगाने आयोजित केली जात असून ती पोशाख डिझाइन, कामगिरी आणि व्यक्तिरेखा चित्रणात स्व-अभिव्यक्ती आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देते. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम: ₹1,50,000/- पेक्षा जास्त आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. यातून अव्वल 80-100 कॉस्प्लेअर्स निवडले जातील आणि ईमेलद्वारे त्यांना सूचित केले जाईल. वेव्हज 2025 मध्ये लाईव्ह चॅम्पियनशिप - अंतिम फेरीतील स्पर्धक पूर्ण कॉस्प्लेमध्ये रॅम्पवर चालतील, त्यांच्या सर्वोत्तम पोझ आणि कामगिरीचे प्रदर्शन करतील.
महत्त्वाच्या तारखा
*नोंदणी सुरू होण्याची तारीख: 28 मार्च 2025
*अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 एप्रिल 2025
अधिक माहिती आणि नोंदणी तपशीलांसाठी, https://creatorsstreet.in/ ला भेट द्या. नोंदणी लिंक https://forms.office.com/r/xpeg7sDASm
* * *
PIB Mumbai | S.Kane/Tushar/Bhakti/Nandini/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117486)
Visitor Counter : 33