कोळसा मंत्रालय
भारताच्या कोळसा क्षेत्राने 2024-25 या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पादनात ओलांडला एक अब्ज टनाचा टप्पा
कोळसा प्रेषणातही दिसून आली उल्लेखनीय प्रगती
Posted On:
01 APR 2025 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
भारताच्या कोळसा क्षेत्राने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकत्रित उत्पादनात एक अब्ज टनचा टप्पा ओलांडत एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उत्पादन वाढविण्याच्या, वितरण सुलभ करण्याच्या तसेच देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या कोळसा मंत्रालयाचे अथक प्रयत्न ही अभूतपूर्व कामगिरी अधोरेखित करते.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकत्रित कोळसा उत्पादनाने एक अब्ज टनचा टप्पा ओलांडला आहे, जो आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 997.83 मेट्रिक टन होता, जो 4.99% इतकी लक्षणीय वाढ नोंदवतो. कमर्शियल आणि कॅप्टिव्ह तसेच इतर घटकांनीही 197.50 मेट्रिक टन (तात्पुरते) कोळसा उत्पादन नोंदवले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 154.16 मेट्रिक टनपेक्षा 28.11% जास्त आहे.

त्याचप्रमाणे, कोळसा प्रेषणातही उल्लेखनीय प्रगती दिसून आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकत्रित कोळसा प्रेषणानेही एक अब्ज टनचा टप्पा ओलांडला आहे, जो आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 973.01 मेट्रिक टन होता, जो 5.34 % ची लक्षणीय वाढ दर्शवितो. कमर्शियल, कॅप्टिव्ह आणि इतर घटकांकडील प्रेषणातही लक्षणीय वाढ झाली आहे, जी 196.83 मेट्रिक टन (तात्पुरते) पर्यंत पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.39 % अधिक आहे, जी 149.81 मेट्रिक टन होती.
ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम वितरण सुनिश्चित करताना देशांतर्गत कोळशाचे उत्पादन वाढविण्याबाबतची भारताच्या प्रगती हा टप्पा अधोरेखित करतो. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक लवचिकता वाढविण्यासाठी कोळसा मंत्रालय स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी, आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच शाश्वत उत्खनन पद्धतीना चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.

* * *
S.Kane/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117383)