राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा
Posted On:
30 MAR 2025 7:14PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, “ईद-उल-फित्र या पवित्र सणानिमित्त, मी भारतात तसेच विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना, विशेषतः मुस्लीम बांधवांना आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते.
ईद-उल-फित्र हा रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवास आणि प्रार्थनेच्या समाप्तीचे प्रतीक आहे. हा सण बंधुता, सहकार्य आणि करुणेची भावना दृढ करतो. तसेच, सामाजिक एकोपा वाढवतो आणि आपल्याला समरस, शांततापूर्ण आणि समृद्ध समाज घडविण्यासाठी प्रेरित करतो. ईद हा सण सहानुभूती, दयाळूपणा आणि दानधर्माच्या भावनेला चालना देणारा आहे.
या सणामुळे सर्वांना आयुष्यात शांती, प्रगती आणि आनंद लाभो आणि सकारात्मक दृष्टीकोनासह पुढे जाण्याची आपल्याला शक्ती मिळो, हीच प्रार्थना.”
कृपया राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116935)
Visitor Counter : 44