सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
“भारताची ऊर्जा आकडेवारी 2025” चे प्रकाशन सादर
Posted On:
29 MAR 2025 9:49AM by PIB Mumbai
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने “भारताची ऊर्जा आकडेवारी 2025” चे वार्षिक प्रकाशन सादर केले आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर हे प्रकाशन उपलब्ध आहे. http://www.mospi.gov.in. या प्रकाशनात असलेल्या एका आकड्यांच्या संचात राखीव साठा, क्षमता, उत्पादन, वापर, तसेच सर्व ऊर्जाविषयक वस्तूंच्या (कोळसा, लिग्नाइट, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, नवीकरणीय ऊर्जा स्रोत इ.) आयात निर्यातीबद्दलची महत्वाची माहिती असेल. या प्रकाशनात (ऊर्जा समतोलाविषयीची) महत्वाचे तक्ते, (सॅनकी आकृत्या) आलेख, व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असलेले शाश्वत ऊर्जा सूचकांक यांचा देखील समावेश असेल.
सध्याच्या या प्रकाशनात पर्यावरण अर्थशास्त्रीय ऊर्जा जमाखर्च (SEEA)च्या 2012 संरचनेनुसार एका नवीन प्रकरणाचाही समावेश असणार आहे. या प्रकरणात आर्थिक वर्ष 2022-23 व 2023-24 साठीच्या मालमत्ता जमाखर्च व प्रत्यक्ष पुरवठा व वापर तक्त्यांचा समावेश असेल.
महत्वाचे मुद्दे :
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताने ऊर्जा पुरवठा व उपयोगात स्थिर व निरोगी वाढ नोंदवली असून कोविड महामारीच्या धक्क्यातून सावरून ‘2047 पर्यंत विकसित भारत’च्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याकडे वाटचाल करत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान उत्तम विस्तार दर्शवला असून एकूण प्राथमिक ऊर्जा पुरवठा (TPES) मध्ये गेल्या वर्षात 7.8 % वाढ होऊन तो आता 9,03,158 KToE (किलो टन तेलाच्या समकक्ष) झाला आहे.

भारताकडे नवीकरणीय ऊर्जा उत्पादनाची भरपूर क्षमता असून ती 31 मार्च 2024 रोजी 21,09,655 मेगावॅट होती. पवनऊर्जा स्रोतापासून ऊर्जा मिळवण्याची क्षमता 11,63,856 मेगावॅट (अंदाजे 55%) असून सौर ऊर्जा क्षमता (7,48,990 मेगावॅट) तर विशाल जलविद्युत (1,33,410) आहे. नवीकरणीय ऊर्जेची निम्म्याहून जास्त उत्पादन क्षमता भारताच्या 4 राज्यांत केंद्रित झाली आहे, राजस्थान (20.3%), महाराष्ट्र (11.8%), गुजरात (10.5%), व कर्नाटक (9.8%).
नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांपासून मिळणाऱ्या वीज उत्पादनाची स्थापित क्षमता (उपयुक्त व अनुपयुक्त) गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 31 मार्च 2015 रोजी असलेल्या 81,593 मेगावॅट वरून 31 मार्च 2024 रोजी ती 1,98,213 मेगावॅट झाली असून त्या काळातील याचा CAGR 10.36% आहे.
नवीकरणीय स्रोतांपासून मिळालेल्या विजेचे (उपयुक्त व अनुपयुक्त) स्थूल उत्पादन गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मधील 2,05,608 GWH वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ते 3,70,320 GWH पर्यंत वाढले असून याचा CAGR गेल्या काही वर्षांत 6.76% आहे.

भारताचे दरडोई ऊर्जा वापर प्रमाण देखील गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मधील 14,682 Mega Joule/प्रति व्यक्ती वरून ते आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 18,410 Mega Joule/प्रति व्यक्ती इतके वाढले असून त्याचा CAGR तितक्या वर्षांसाठी 2.55 % इतका आहे.

विजेच्या संप्रेषणातील व वितरणातील नुकसान गेल्या काही वर्षात खूप कमी झाल्यामुळे विजेचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये विजेच्या संप्रेषणातील व वितरणातील नुकसान 23% होते ते आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कमी होऊन 17% इतकेच उरले आहे.
वीज वापर करणाऱ्या सर्व महत्वाच्या क्षेत्रांमधील औद्योगिक क्षेत्रात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मधील औद्योगिक क्षेत्रातील 2,42,418 KToE इतक्या वापरात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3,11,822 KToE पर्यंत वाढ झाली आहे. वाणिज्य, सार्वजनिक सेवा, कृषी, वनसेवा इत्यादी अनेक क्षेत्रांच्या वापरात देखील याच काळात स्थिर वाढ झालेली दिसून येते.
***
S.Pophale/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116546)
Visitor Counter : 95