आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्यावतीने इतर संस्थांच्या सहकार्याने किशोरवयातील मुलांसाठी ‘लेटस फिक्स अवर फूड’ उपक्रमाचे आयोजन
Posted On:
28 MAR 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2025
आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि एनआयएन म्हणजे राष्ट्रीय पोषण संस्था, तसेच पीएचएफआय म्हणजेच भारत सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठान, आणि युनिसेफ-इंडिया यांच्या वतीने ‘लेट्स फिक्स अवर फूड’ (LFOF) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज नवी दिल्लीमध्ये या संदर्भात आयसीएमआर येथे संबंधित उपक्रमाचा प्रसार करणे आणि भागधारकांशी चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला. देशातील किशोरवयीन मुले ज्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सेवन करतात, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. या परिणामकारक घटकांमुळे मुलांचे वजन जास्त वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. किशोरवयीन मुलांमध्ये वाढलेली लठ्ठपणाची समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या कार्यक्रमामध्ये नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल आणि भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी यावेळी चर्चेच्या दरम्यान प्रमुख धोरणात्मक माहिती आणि पोषण साक्षरता संसाधनांचे प्रकाशन केले. कार्यक्रमाला आसीएमआर-एनआयएनच्या संचालक डॉ. भारती कुलकर्णी उपस्थितीत होत्या.

आजच्या काळामध्ये या समस्येची निकड अधोरेखित करताना, डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, "किशोरवयीन मुलांमध्ये जास्त वजन आणि त्यांचा वाढता लठ्ठपणा, हे एक उदयोन्मुख संकट आहे. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा सार्वजनिक आरोग्यावर आणि आर्थिक उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो." ते पुढे म्हटले की, "लेट्स फिक्स अवर फूड’’ (एलएफओए) कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. किशोरवयीन मुलांना निरोगी ठेवणारे अन्न ग्रहण केले पाहिजे, तसेच आरोग्यदायी खाण्याच्या सवयींसाठी मजबूत धोरणे राबवण्यासाठी, हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे."
डॉ. राजीव बहल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "किशोरवयीन मुलांच्या पोषणात गुंतवणूक करणे, ही केवळ आरोग्याची प्राथमिकता नाही तर एक राष्ट्रीय अत्यावश्यकता आहे. मुलांनी आरोग्यदायी खाण्याच्या सवयी जोपासल्या पाहिजेत. मुलांच्या अन्नपदार्थांमध्ये चरबी, साखर किंवा मीठ यांचे प्रमाण जर जास्त असेल, तर त्या अन्नपदार्थांवर कर लावणे आणि पोषण साक्षरतेला प्रोत्साहन देणे यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. मुलांच्या चांगल्या पोषणासाठी अशा प्रकारचे धोरणे राबवून, आपण भावी पिढ्यांचे कल्याण सुरक्षित करू शकू."

यावेळी डॉ. भारती कुलकर्णी यांनी अधोरेखित केले की, "केवळ वैज्ञानिक संशोधनच उपयुक्त आहे असे नाही, तर त्याचा योग्य प्रसार करण्यासाठी विचारपूर्वक उपक्रम राबविण्याची गरज आहे. तसेच मुलांसाठी पोषक आहार धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. ‘एलएफओएफ’ या सांघिक उपक्रमाच्या कार्यासाठी मूल्यवर्धित अंतर्दृष्टी प्रदान करण्यात आली. यामुळे निरोगी राहण्यासाठी कोणत्या अन्नाची निवड करावी आणि चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन द्यावे, याची किशोरवयीन मुलांना माहिती दिली गेली. तसेच यासाठी कौशल्य-आधारित पोषण साक्षरता वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये मदत मिळू शकते." असेही डॉक्टर भारती कुलकर्णी म्हणाल्या.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2116365)
Visitor Counter : 32