कंपनी व्यवहार मंत्रालय
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आयोजित करणार आणखी एक ‘कॅन्डीडेट ओपन हाऊस’
अर्जदारांच्या प्रश्नांवर तत्काळ उत्तरे देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले संवादात्मक ओपन हाऊस
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2025 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
मागील सत्रांना मिळालेले यश लक्षात घेता, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) 27 मार्च 2025 रोजी पीएम इंटर्नशिप योजनेसाठी आणखी एक ‘कॅन्डीडेट ओपन हाऊस’, म्हणजेच ‘उमेदवारांसाठीचा खुला मंच’ आयोजित करणार आहे. पात्र उमेदवारांना पाठबळ देण्याच्या आणि त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आयोजित केला जाणारा हा संवादात्मक मंच, अर्जदारांना त्यांचे सर्वात महत्वाचे प्रश्न हाताळण्यासाठी अमूल्य दृष्टीकोन आणि तत्काळ उपाय मिळवून देईल. साप्ताहिक तत्त्वावर आयोजित करण्यात येणारी ही ‘ओपन हाऊस’ अर्ज प्रक्रियेद्वारे पुढे येणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा ‘टचपॉइंट; (संपर्क केंद्र) म्हणून भूमिका बजावते.
आगामी सत्रातील उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे, उद्योग क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेले एक विशेष सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये ते इंटर्नशिपचे मूल्य, करिअर-बिल्डिंग रणनीती आणि व्यावसायिक विकास यावर सखोल मार्गदर्शन करतील. याव्यतिरिक्त, मागील गटातील यशस्वी प्रशिक्षणार्थी त्यांचे वैयक्तिक अनुभव इतरांना सांगतील, पीएम इंटर्नशिप योजनेने त्यांचे करिअर कसे पुढे नेले याबद्दल प्रत्यक्ष दृष्टीकोन मांडतील. विशेषत: इच्छुक उमेदवारांसाठी हे सत्र विशेष लाभदायक ठरेल.
ही चर्चा, संरचित आणि उत्पादक ठरावी, यासाठी उमेदवारांना ईमेलद्वारे पाठवलेल्या ऑनलाइन लिंक वर त्यांचे प्रश्न आगाऊ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मॉडरेटर्सना सर्वात महत्वाच्या प्रश्नांवर तत्काळ उत्तर देता येईल, तसेच चालू सत्रादरम्यान उपस्थित केलेल्या थेट प्रश्नांना वेळेवर उत्तर देता येईल.
या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तज्ज्ञांची समिती असेल. यामध्ये एमसीएचे वरिष्ठ अधिकारी, धोरण आणि प्रक्रियात्मक समस्यांवरील प्रकल्प व्यवस्थापन टीम आणि मंत्रालयाचे तांत्रिक भागीदार असलेल्या BISAG च्या तांत्रिक तज्ञांचा समावेश असेल.
पीएम इंटर्नशिप योजनेच्या सर्व अर्जदारांना पारदर्शकता, मुक्त संवाद आणि गुंतवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय समर्पित आहे. या खुल्या मंचाच्या माध्यमातून उमेदवारांशी सातत्याने संवाद साधून, युवा व्यावसायिकांना सक्षम करणे, आणि त्यांना या प्रतिष्ठेच्या संधीचा लाभ मिळवून देणे, हे एमसीए चे उद्दिष्ट आहे.
तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन विचारांमध्ये स्पष्टता आणण्याची ही संधी चुकवू नका! 27 मार्च 2025 हा दिवस राखून ठेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रसारित होणार्या नव्या सूचनांकडे लक्ष ठेवा.
ओपन हाऊस मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर नोंदणी करा: https://mcavc.webex.com/weblink/register/r4776dc552578b74c64f5b9eee3d8a716
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2115404)
आगंतुक पटल : 33