शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालयाने सुरू केला"बालपन की कविता उपक्रम: लहान मुलांसाठी भारतीय यमक/कवितांचे पुनर्संचयन"
Posted On:
25 MAR 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एन ई पी ), 2020 बहुभाषिकतेच्या सामर्थ्यासह सार्वत्रिक आणि उच्च-गुणवत्तापूर्ण प्रारंभीच्या बालपणातील शिक्षणाचे महत्त्व तसेच प्राथमिक शिक्षणात मुलांच्या भाषांचा समावेश यावर भर देते. एन ई पी 2020 चा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (डीओएस ईएल ) "बालपन की कविता उपक्रम सुरू केला आहे: लहान मुलांसाठी भारतीय यमक/कवितांचे पुनर्संचयन" करणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश असा आहे की लहान मुले त्यांच्या मातृभाषेत सहज समजण्याजोग्या आणि आनंददायी कविता आणि यमकांद्वारे त्यांच्या सभोवतालच्या जगाशी परिचित होऊन पायाभूत टप्प्यावर चांगले शिक्षण घेऊ शकतील.
या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी, डीओएस ईएल, माय जी ओ व्ही च्या सहकार्याने "बालपन की कविता उपक्रम: लहान मुलांसाठी भारतीय यमक/कविता पुनर्संचयित करणे" मध्ये योगदान देण्याचे आवाहन करत आहे. स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक लोकसाहित्यातील लोकप्रिय असलेल्या विद्यमान कविता/यमक (लेखकाचे नाव सांगून) किंवा नवीन तयार केलेल्या आनंददायी कविता/यमक तीन श्रेणींमध्ये पाठवू शकतात:
पूर्व-प्राथमिक (वय 3-6)
इयत्ता 1 (वय 6-7)
इयत्ता 2 (वय 7-8)
सर्व भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्ये देखील प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. यात भारतीय संदर्भात सांस्कृतिक महत्त्व असलेल्या प्रादेशिक यमक/कवितांचाही समावेश असू शकतो. ही स्पर्धा 26.03.2025 ते 22.04.2025 पर्यंत MyGov वेबसाइट (https://www.mygov.in/) वर सुरू होत आहे. सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेची इतर माहिती MyGov वेबसाइटवर पाहता येईल.
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115102)
Visitor Counter : 48