इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, बेंगळुरूमध्ये ‘नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो आणि भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था परिषद’ करणार आयोजित

प्रविष्टि तिथि: 24 MAR 2025 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2025

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅनो तंत्रज्ञान पुढाकार विभागातर्फे आयआयएससी बेंगळुरू, आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी गुवाहाटी यांच्या सहकार्याने, ‘नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो आणि भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था  परिषद’आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9:00 वाजल्यापासून आयआयएससी बेंगळुरू येथील  राष्ट्रीय विज्ञान परिषद भवन इथे पार पडेल.  

या उपक्रमाचा उद्देश सरकारी संस्था, उद्योगक्षेत्र, शैक्षणिक संस्था, धोरणात्मक क्षेत्रे, स्टार्टअप्स आणि महत्त्वपूर्ण भागधारकांना एकत्र आणणे आणि या क्षेत्रातील नवोन्मेष व सहकार्याला चालना देणे हा आहे.  

टेक इनोव्हेशन्सवरील रोड शो

या रोड शोमध्ये क्वांटम तंत्रज्ञान, न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग, एआय, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्समधील संधींसह नॅनो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातील स्वदेशी प्रगतीचे सादरीकरण करण्यात येईल.  

परिषदेबाबत बोलताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  सचिव एस. कृष्णन म्हणाले, “नॅनो तंत्रज्ञान रोड शो हा भारताच्या सेमीकंडक्टर स्वयंपूर्णतेकडे जाणाऱ्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मंत्रालयाने  देशभरातील 6 आयआयटी आणि भारतीय विज्ञान संस्थेमध्ये नॅनो विज्ञान केंद्रांना प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून सेमीकंडक्टर क्षेत्रात वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांचा  एक सक्षम चमू  तयार होईल.”

S.Kakade/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2114464) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada