पंतप्रधान कार्यालय
भारताच्या 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाच्या ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
21 MAR 2025 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करून, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आणि आत्मनिर्भरतेसाठी सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.
या क्षेत्राशी संबंधित लोकांच्या अथक समर्पणाची आणि कठोर परिश्रमाची दखल घेत, "भारतासाठी अभिमानाचा क्षण" या शब्दात मोदींनी या कामगिरीचे कौतुक केले.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये माहिती दिली की भारताने 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा मोठा टप्पा ओलांडला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना, मोदींनी एक्स या समाज माध्यमावर वर लिहिले की; "भारतासाठी अभिमानाचा क्षण!"
1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, जी ऊर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आणि आत्मनिर्भरतेप्रती आमची वचनबद्धता अधोरेखित करते. हे यश या क्षेत्राशी संबंधित सर्वांचे समर्पण आणि कठोर परिश्रम यांना देखील प्रतिबिंबित करते.
* * *
JPS/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113630)
Visitor Counter : 63
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam