माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डब्ल्यूएएम स्पर्धेचे मुंबईत आयोजन
Posted On:
20 MAR 2025 9:22PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मार्च 2025
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी), मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया (एमईएआय) च्या सहकार्याने, मुंबईत डब्ल्यूएएम ! (WAVES अॅनिमे आणि मँगा स्पर्धा) च्या पुढील आवृत्तीची घोषणा केली आहे. डब्ल्यूएएम!हा 1 ते 4 मे 2025 दरम्यान,मुंबईत होणाऱ्या WAVES (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट) अंतर्गत ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’चा एक भाग आहे. डब्ल्यूएएम! च्या मागील आवृत्त्यांचे गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी आणि दिल्ली येथे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
मुंबई आवृत्ती ‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रतिनिधींना विविध श्रेणींमध्ये सहभागी होता येणार आहे. मुंबईतील ‘डब्ल्यूएएम’ आयोजनामध्ये पुढील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
• मँगा (जपानी-शैलीतील कॉमिक्स)
• वेबटून (डिजिटल कॉमिक्स)
• अॅनिमे (जपानी-शैलीतील अॅनिमेशन)
या आयोजनामध्ये सहभागी केवळ त्यांची प्रतिभा प्रदर्शित करणार आहेत,असे नाही तर,एक रोमांचक ‘व्हॉइस अॅक्टिंग’ -ध्वनी कला आणि ‘कॉस्प्ले’ स्पर्धा होणार आहे. यावेळी वैभवी स्टुडिओजद्वारे विकसित केलेल्या भारतातील पहिल्या अॅनिमची एक झलक पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. यावेळी विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचा आनंद घेण्यासाठी एका पुरस्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या समारंभानेच दिवसाचा समारोप होईल.
स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी सहभागी होणाऱ्या उद्योगातील काही दिग्गजांचा समावेश आहे. यावेळी व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष, आणि नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स - अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्य चिंचलीकर ; असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट - अॅक्विझिशन अँड प्रोग्रामिंग (किड्स क्लस्टर), स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अभिषेक दत्ता ; मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, अभिनेता तसेच गुलमोहर मीडियाचे सुमीत पाठक ; आवाज क्षेत्रातील कलाकार आणि असोसिएशन ऑफ व्हॉइस आर्टिस्ट्सचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष, अभिनेता - अंकूर जवेरी; 2D अॅनिमेशन व्यावसायिक आणि भारतातील पहिल्या मँगा - बीस्ट लीजनचे निर्माते जझील होमावझीर उपस्थित राहणार आहेत.
एमईएआयचे सचिव अंकूर भसीन यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नाही तर तो सर्जनशीलतेचा उत्सव आहे आणि कलाकारांना त्यांचे अद्वितीय आवाज प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.
या कार्यक्रमाच्या तपशीलासाठी: अंकूर भसीन, सचिव, मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया; 98806 23122; secretary@meai.in; www.meai.in/wam येथे संपर्क साधावा.
वेव्हज विषयी माहिती -
माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई ) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारी, पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई, येथे आयोजित केली आहे.
याविषयी काही प्रश्न आहेत का? उत्तरे शोधण्यासाठी येथे क्लिक करणे.
चला तर मग, आमच्यासोबत प्रवासाला! WAVES साठी आत्ताच नोंदणी करा (लवकरच येत आहे!)
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113470)
Visitor Counter : 30