माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज (WAVES) 2025 मधील ॲनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (एएफसी) च्या दुसर्या फेरीसाठी 78 क्रिएटर्सची निवड
वेव्हज (WAVES) 2025 च्या व्यासपीठावर लंडन पासून बाली पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचे स्वागत
Posted On:
13 MAR 2025 8:25PM by PIB Mumbai
मुंबई, 13 मार्च 2025
वेव्हज (WAVES) 2025 च्या ॲनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (एएफसी) मध्ये 78 क्रिएटर्सनी स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला असून, जागतिक ॲनिमेशन चित्रपट निर्मितीमधील असामान्य प्रतिभेच्या आविष्काराला संधी मिळणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डान्सिंग ॲटम्सच्या सहयोगाने या स्पर्धेचे आयोजन केले असून, ती क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन -1 चा एक महत्त्वाचा भाग आहे. यात ॲनिमेशन, एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी), व्हीआर (व्हर्च्युअल रिॲलिटी), व्हर्च्युअल प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स अशा पाच प्रकारांचा समावेश आहे.
जागतिक मनोरंजन उद्योगातील धुरीणांचा समावेश असलेल्या ज्युरी पॅनेलने (निवड समिती) अस्सलता, कथानकाचा प्रभाव, मनोरंजन मूल्य, बाजारपेठेवरील अपील (छाप), प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता आणि तांत्रिक अंमलबजावणी, या निकषांच्या आधारे चित्रपट प्रकल्पांचे मूल्यांकन केले.ज्युरी पॅनेल सदस्यांमध्ये, एंटरटेनमेंट मार्केटिंग प्रोफेशनल (मनोरंजन विपणन व्यावसायिक) जान नागल, ॲनिमेशन वर्ल्ड नेटवर्कचे मुख्य संपादक आणि संस्थापक डॅन सार्टो, दिग्दर्शक, निर्माता, लेखक जियानमार्को सेरा, ख्यातनाम लेखिका इंदू रामचंदानी, आणि पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते वैभव पिवळटकर यांचा समावेश होता.
दुसर्या फेरीत निवड झालेले स्पर्धक, विद्यार्थी, हौशी, व्यावसायिक आणि स्टुडियो विश्वाचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय, या स्पर्धेत लंडन, बाली आणि कॅनडासह आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी भाग घेतला असून, यामुळे कथाकथनाला जागतिक दृष्टीकोन प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य आणि कौटुंबिक शिक्षणावरील प्रभावी कथानकांसाठी तीन विशेष उल्लेखनीय चित्रपट प्रकल्पांनी प्रशंसा प्राप्त केली आहे. निवड झालेल्या प्रवेशिकांचे अंतिम सादरीकरण 20 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर मनोरंजन उद्योगातील तज्ञांच्या नवनियुक्त निवड समिती द्वारे त्याचे परीक्षण केले जाईल.
पहिल्या तीन विजेत्या प्रकल्पांना पाच लाख रुपयांपर्यंत (एकूण) रोख पारितोषिक दिले जाईल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, माहिती आणि प्रसारण मंत्रालय सर्वोत्तम क्रिएटर्सना मुंबईच्या विशेष सहलीवर आमंत्रित करेल, जेथे ते जगभरातील निर्माते, ओटीटी प्लॅटफॉर्म, वितरक आणि गुंतवणूकदारांसमोर त्यांचे प्रकल्प सादर करतील. अंतिम स्पर्धकांची घोषणा 10 एप्रिल 2025 रोजी अथवा त्यापूर्वी केली जाईल.
अधिक माहितीसाठी waves@dancingatoms.com येथे ईमेल करावा, अथवा https://waves.dancingatoms.com/wafc येथे भेट द्यावी.
त्याचप्रमाणे प्रतिभावान क्रिएटर्सना जागतिक खरेदीदारांशी जोडण्यासाठी डिझाइन केलेल्या ‘वेव्हज बझार (WAVES Bazaar)’ या जागतिक ई-मार्केटप्लेस वर त्यांचे प्रकल्प सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
उद्योग व्यावसायिक आणि खरेदीदारांना देखील गतिशील आणि जागतिक B2B ॲनिमेशन परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि सर्वात आश्वासक सृजनशील मनांशी जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
वेव्हज (WAVES)
मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज), म्हणजेच जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी हा महत्वाचा टप्पा ठरेल.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे मिळतील.
चला, आमच्याबरोबर या! वेव्हजसाठी लगेच नोंदणी करा (लवकरच येत आहे!).
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111314)
Visitor Counter : 39