पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

प्रविष्टि तिथि: 12 MAR 2025 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2025


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

या सोहळ्यात, मॉरिशस प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती धरमबीर गोकूल यांनी पंतप्रधान मोदी यांना 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन' (जी.सी.एस.के) हा मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी हा पुरस्कार भारत आणि मॉरिशस यांच्यातील विशेष मैत्रीला तसेच 1.4 अब्ज भारतीय नागरिक आणि मॉरिशसच्या 1.3 दशलक्ष बंधू-भगिनींना समर्पित केला.

राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय नौदलाच्या संचलन पथकाने परेडमध्ये भाग घेतला. याशिवाय, भारतीय नौदलाचे एक जहाजही या निमित्ताने मॉरिशसच्या बंदरावर दाखल झाले.


N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2110813) आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Nepali , Bengali , Manipuri , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam