पंतप्रधान कार्यालय
मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोकूल द्वारा आयोजित मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश
Posted On:
11 MAR 2025 9:33PM by PIB Mumbai
महामहीम राष्ट्रपती धरमबीर गोकूल जी ,
प्रथम महिला वृंदा गोकूल जी ,
माननीय उपराष्ट्रपती रॉबर्ट हंगली जी ,
पंतप्रधान रामगुलाम जी आणि
सन्माननीय अतिथीगण ,
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला आहे.
या आदरातिथ्यासाठी आणि सन्मानासाठी मी राष्ट्रपती महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो.
हे केवळ एक भोजन नाही; तर भारत आणि मॉरिशस यांच्यातील सखोल आणि घनिष्ठ संबंधांचे प्रतीक आहे.
मॉरिशसचे खाद्यपदार्थ केवळ चविष्ट नाहीत, तर ते देशाची समृद्ध सामाजिक विविधता देखील प्रतिबिंबित करतात.
ते भारत आणि मॉरिशस यांच्या सामायिक वारशाचे प्रतीक आहेत.
मॉरिशसच्या पाहुणचारातील प्रत्येक कृतीत आपल्या चिरस्थायी मैत्रीची आत्मीयता, आपुलकी आणि गोडवा सहज अनुभवता येतो.
या विशेष प्रसंगी, मी महामहीम राष्ट्रपती धरमबीर गोकूल आणि वृंदा गोकूल यांना उत्तम आरोग्य आणि चांगले आयुष्य लाभो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मॉरिशसच्या नागरिकांच्या निरंतर प्रगती, समृद्धी आणि आनंदासाठीही शुभेच्छा देतो. तसेच, आपल्या दृढ भागीदारीसाठी भारताची अखंड वचनबद्धता मी पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त करतो.
जय हिंद!
विवे मॉरिस!
***
SushamaK/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110620)
Visitor Counter : 11
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada