माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्ह्ज 2025 मधील 'रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज' च्या स्पर्धकांना इलेक्ट्रॉनिक संगीत उद्योगातील दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळणार
ईडीएम चॅलेंजसाठी नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च 2025
Posted On:
11 MAR 2025 8:30PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च 2025
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (वेव्ह्ज ), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेतील 'रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज', ही स्पर्धा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार असून, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) अंतर्गत, संगीत निर्मिती आणि लाइव्ह परफॉर्मन्समधील नवोन्मेष , सृजनशीलता आणि सहयोग साजरा करण्यासाठी जगभरातील प्रतिभावंत एकत्र येतील. भारतीय संगीत उद्योगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने आयोजित केलेला हा उपक्रम 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'चा एक भाग असून, म्युझिक फ्यूजन, इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि डीजे कलाप्रकारचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे.
भारतीय संगीत उद्योगाने बहुप्रतीक्षित ईडीएम चॅलेंजसाठी अधिकृत नॉलेज पार्टनर म्हणून लॉस्ट स्टोरीज अॅकॅडमीबरोबर नुकतीच भागीदारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक संगीत शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून, लॉस्ट स्टोरीज अॅकॅडमीने इलेक्ट्रॉनिक संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांना जागतिक मान्यता मिळवण्यात सहाय्य केले आहे. ईडीएम चॅलेंजमधील आपल्या भूमिकेचा एक भाग म्हणून, लॉस्ट स्टोरीज अॅकॅडमी, स्पर्धकांना मार्गदर्शन करेल, तसेच त्यांना आपले कौशल्य विकसित करून जागतिक संगीत पटलावर यशस्वी पदार्पण करण्याची तयारी करण्यासाठी सक्षम करेल.

ईडीएम चॅलेंजसाठी नोंदणी खुली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे.
"रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज" ही स्पर्धा, इलेक्ट्रॉनिक संगीत क्षेत्रातील कलाकारांना ऑडिओ, व्हिज्युअल आणि करमणूक क्षेत्रात त्यांची सृजनशीलता आणि नवोन्मेश प्रदर्शित करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करेल.
इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) निर्मितीचा पूर्वानुभव असलेल्या जगभरातील कलाकार, संगीतकार, वादक आणि कलाकारांसाठी खुली असलेली ही स्पर्धा, प्रतिभावंतांसाठी पदार्पणाची संधी देणारी ठरेल. लॉस्ट स्टोरीज अॅकॅडमीबरोबर नुकत्याच झालेल्या भागीदारीमुळे, स्पर्धकांना भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडून मोलाचा दृष्टीकोन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि या उद्योगात प्रवेश करण्याची विशेष संधी मिळेल.
'रिझोनेट: द ईडीएम चॅलेंज', स्पर्धा म्हणजे, म्युझिक फ्यूजन, इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि डीजे कला प्रकारचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न आहे.
'रिझोनेट: द ईडीएम चॅलेंज' ही या स्पर्धेची संकल्पना असून, सर्वसमावेशक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध संगीत निर्मितीसाठी जागतिक संगीत शैलींचा वापर करण्यावर स्पर्धेचा भर राहील.
चॅलेंजबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110512)
Visitor Counter : 17