माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज (WAVES) अँटी-पायरसी आव्हान
अत्याधुनिक उपायांद्वारे आशय सुरक्षा मजबूत करणे
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2025 12:35PM
|
Location:
PIB Mumbai
वेव्हज अँटी-पायरसी चॅलेंज हा क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसचा एक महत्त्वाचा भाग असून, जलद तांत्रिक प्रगतीच्या युगात डिजिटल आशयाचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे. डिजिटल मीडियाचा वापर वाढत आहे त्याच प्रमाणात पायरसी, अनधिकृत वितरण आणि आशयात केली जाणारी फेरफार ही आव्हाने देखील वाढत आहेत. ही आव्हाने फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेषी उपायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्यक्ती, संशोधन पथके, स्टार्टअप्स आणि स्थापित संस्थांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) द्वारे आयोजित या स्पर्धेत 1,296 जणांनी नाव नोंदणी केली आहे, यातून डिजिटल आशय सुरक्षेमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर रस असल्याचे दिसून येते.
हे आव्हान, जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद - वेव्हज 2025 चा एक भाग आहे, जे सर्व प्रसार माध्यमे आणि मनोरंजन (M&E) क्षेत्राच्या एककेंद्राभिमुखतेसाठी तयार केलेले एक अद्वितीय केंद्र आणि बोलके व्यासपीठ आहे. हा एक प्रमुख जागतिक कार्यक्रम असून त्याचा उद्देश जागतिक प्रसार माध्यमे आणि मनोरंजन (M&E) उद्योगाचे लक्ष भारताकडे वळवणे आणि आपल्या प्रतिभेद्वारे भारतीय प्रसार माध्यमे आणि मनोरंजन (M&E) क्षेत्राशी जोडणे हे आहे. 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे होणारी ही शिखर परिषद चार प्रमुख स्तंभांवर रचली गेली आहे - ब्रॉडकास्टिंग आणि इन्फोटेनमेंट; AVGC XR मध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स; आणि एक्सटेंडेड रिॲलिटी, डिजिटल मीडिया आणि इनोव्हेशन; आणि फिल्म्स यांचा समावेश आहे. वेव्हज अँटी-पायरसी चॅलेंज ब्रॉडकास्टिंग आणि इन्फोटेनमेंट या श्रेणी अंतर्गत येते, जे आशयाची सत्यनिष्ठा सुनिश्चित करताना माहिती प्रसारणाच्या विकसित पद्धतींवर लक्ष केंद्रित करते.

क्रिएट इन इंडिया चॅलेंजेससाठी 73,000 पेक्षा जास्त इच्छुक आणि व्यावसायिक निर्मात्यांनी नाव नोंदणी केली आहे. यातून भारताच्या प्रसार माध्यम आणि मनोरंजन प्रणालीमध्ये जगाची वाढती रुची दिसून येते.
या आव्हानाचा उद्देश फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांनी विकसित केलेल्या नवोन्मेषी उपायांना चालना आणि प्रोत्साहन देणे, हा आहे. स्थानिक नवोन्मेषांना चालना देऊन, हे आव्हान पुढील बाबी साधण्याचा प्रयत्न करत आहे:
- देशांतर्गत कंपन्यांना त्यांचे उपाय प्रदर्शित करण्यासाठी आणि ओळख मिळविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे.
- डिजिटल मीडियाची सुरक्षा आणि मागोवा घेण्याची क्षमता वाढवणाऱ्या नवीन तंत्रांच्या विकासाला प्रोत्साहन देणे.
- विद्यमान मीडिया वर्कफ्लोमध्ये विनाखंड जोडता येतील अशा व्यावहारिक अनुप्रयोगांना प्रोत्साहन देणे.
- आशय संरक्षणातील सध्याच्या आणि नवनवीन आव्हानांना तोंड देणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या वाढीस पाठिंबा देणे.
संदर्भ:
कृपया पीडीएफ फाइल पाहा.
***
M.Pange/S.Mukhedkar//P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
रिलीज़ आईडी:
2109481
| Visitor Counter:
64