राष्ट्रपती कार्यालय
भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकार्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
Posted On:
04 MAR 2025 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकार्यांनी (78वी तुकडी) आज (4 मार्च, 2025) राष्ट्रपती भवन इथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

यावेळी राष्ट्रपतींनी या प्रशिक्षणार्थी अधिकार्यांना संबोधित केले.भारतीय महसुली सेवेचे अधिकारी हा शासन आणि कल्याणकारी योजनांच्या अनुषंगाने शासन प्रशासन व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. देशाच्या गतीमान अर्थव्यवस्थेसाठी करांचे महत्त्वही राष्टपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले.भारतीय महसुली सेवेचे अधिकारी या नात्याने कर या महत्त्वाच्या संसाधनाचे संकलन न्याय्यपूर्ण, प्रभावीरित्या आणि पारदर्शक पद्धतीने सुनिश्चित करण्यात या अधिकाऱ्यांना अत्यंत महत्त्वची भूमिका पार पाडावी लागणारअसल्याची जाणिवही राष्ट्रपतींनी त्यांना करून दिली.
बदलत्या काळातील वाढत्या अपेक्षा आणि सरकारी उपक्रमांमुळे अधिक कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सोयीसुविधांचे नवे युग सुरू झाले आहे, आणि डिजिटल तंत्रज्ञान हा या बदलांच्या केंद्रस्थानतला घटक आहे असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. प्राप्तिकर विभाग प्रगत डेटा विश्लेषणाचा वापर करून उल्लेखनीय अचूकतेसह विवरणपत्रांमधल्या विसंगती शोधतो,तर त्याचवेळी प्रामाणिक करदात्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याचीही सुनिश्चितीही करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे मात्र, ते मानवी मूल्यांचा पर्याय नाही असा मोलाचा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला.माहिती साठ्यावर आधारित प्रणालींमुळे कार्यक्षमता वाढू शकते, परंतु त्या सहानुभूती आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांमध्ये बदल घडवून आणू शकत नाहीत ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. सर्व अधिकाऱ्यांनी आपली धोरणे आणि कृतींमधून सर्वांना, विशेषतः वंचित आणि दुर्बल घटकांना,विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी या संबोधनातून व्यक्त केली.

भारतीय महसूल सेवेच्या (78 वी तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये रॉयल भूतान सेवेचे दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचाही समावेश होता.हे दोन्ही अधिकारी नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकदामीमध्ये (NADT) प्रारंभिक प्रशिक्षण घेत आहेत.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.
Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108155)
Visitor Counter : 16