सांस्कृतिक मंत्रालय
घाटाची स्वच्छता, आशीर्वाद प्राप्ती
महाकुंभ 2025 नंतरचे दुहेरी प्रयत्न
Posted On:
03 MAR 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये 66.30 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वतीच्या पवित्र संगमात स्नान केल्याने श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा मिलाफ प्रतीत झाला. 45 दिवस चाललेला हा मेळा भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनला.
महामहोत्सवाची सांगता झाल्यावर, शहर पूर्ववत करण्याच्या आणि कुंभ परिसराचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या तितक्याच महत्त्वाच्या कार्याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यांपैकी एक असलेला महाकुंभ मेळा संपन्न झाल्यावर त्या स्थळाची स्वच्छता करण्यासाठी अनन्यसाधारण प्रयत्नांची आवश्यकता होती. हे ओळखून, राज्य सरकारने त्वरित व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली. कुंभमेळा परिसर पूर्वपदावर आणण्यासाठी 15 दिवसांची विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. समर्पित स्वयंसेवकांसह हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नदीकाठ, रस्ते आणि तात्पुरत्या वस्त्या स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले.
स्वच्छता मोहीम सुरू असताना, प्रशासन आणि पर्यावरणवाद्यांनी या पवित्र पाण्याचे पावित्र्य राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांशिवाय महाकुंभ 2025 चे यशस्वी आयोजन अशक्य होते. त्यांच्या कठोर परिश्रमाची दखल घेत, राज्य सरकारने संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कुंभ परिसर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या 'कर्मयोगींचा' सन्मान केला. केवळ कचरा गोळा करण्याव्यतिरिक्त, स्वच्छता मोहिमेत पद्धतशीर कचरा विल्हेवाट लावणे, तात्पुरत्या पायाभूत सुविधा हटवणे आणि प्रदेशाचे पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. यासाठी विशेष प्रयत्न केले गेले:
· तात्पुरती शौचालये पाडणे:
· कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे
· आवश्यक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करणे:
· तात्पुरत्या वस्त्या हटवणे:
महाकुंभ 2025 च्या यशस्वी अंमलबजावणीने कार्यक्रम व्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये नवीन मापदंड स्थापित केले आहेत. शहर पूर्वस्थितीत येत असताना, हा ऐतिहासिक मेळा भविष्यातील महामहोत्सवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करेल.

तात्पर्य, महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक संगम नव्हता; मानवी तत्परता, जबाबदारी आणि स्वच्छ आणि अधिक शाश्वत पर्यावरण राखण्याच्या सामूहिक भावनेचे ते द्योतक होते. भाविक त्यांच्या पवित्र यात्रेच्या आठवणी जागवत असताना, प्रयागराज शहर पूर्वपदावर येत त्याच्या समृद्ध आणि कालातीत इतिहासातील पुढील अध्यायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.
संदर्भ
माहिती आणि जनसंपर्क विभाग (DPIR), उत्तर प्रदेश सरकार
महाकुंभ मालिका: 25/वैशिष्ट्य
पीडीएफ फाइल साठी कृपया येथे क्लिक करा.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107950)
Visitor Counter : 56