गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील 12 व्या प्रादेशिक 3 आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाचा जयपूर येथे प्रारंभ
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रो प्लॅनेट पीपल अॅप्रोच (पी-3 दृष्टिकोन) वर भर
Posted On:
03 MAR 2025 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील 12 व्या प्रादेशिक 3आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था मंचाचा आज जयपूर येथे प्रारंभ झाला. उद्घाटन सत्रात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल,यांच्यासह इतर मान्यवर तर जपानचे पर्यावरण मंत्री असाओ केइचिरो यांनी आभासी संदेशाद्वारे सहभाग नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचाच्या प्रतिनिधींसोबत भारत पी-3 (प्रो प्लॅनेट पीपल) अर्थात वसुंधरा स्नेही जन दृष्टिकोनाचा अंगीकार करून त्याचे जोरदार समर्थन करतो यावर भर असलेला एक विशेष लेखी संदेश सामायिक केला. चक्राकार अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत आपले अनुभव आणि बोध सामायिक करण्यात भारताने नेहमीच अधिक रुची दर्शवली आहे असेही त्यांनी नमूद केले.

त्यांच्या संदेशात, त्यांनी शाश्वत शहरी विकास आणि संसाधन कार्यक्षमता यांची खातरजमा करण्यात 3आर आणि चक्राकार अर्थव्यवस्था तत्त्वांची भूमिका अधोरेखित केली. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन भविष्यासाठी भारताची बांधिलकी बळकट करणाऱ्या मिशन लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) आणि कॉप 26 मध्ये जाहीर केलेल्या पंचामृत ध्येयांसह जागतिक शाश्वतता प्रयत्नांमधील भारताच्या नेतृत्वावर त्यांनी प्रकाश टाकला.
सिटीज कोलिशन फॉर सर्कुलॅरिटी (सी-3) ची सुरुवात
पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, मनोहर लाल यांनी सिटीज कोलिशन फॉर सर्कुलॅरिटी (सी-3) ची घोषणा केली, जी शहरांमध्ये आपसात सहयोग, माहितीची देवाण-घेवाण आणि खाजगी क्षेत्रातील भागीदारींसाठी एक बहु-राष्ट्रीय युती आहे. ते म्हणाले, “या मंचानंतर युतीची रचना आणि कार्यात्मक चौकट अंतिम करण्यासाठी सदस्य राष्ट्रांचा एक कार्यगट तयार करण्याचा आमचा प्रस्ताव आहे.” हे देशांमधील शहर-शहर भागीदारीमध्ये परिवर्तनकारी ठरेल अशी अपेक्षा आहे. हा मंच संसाधन कार्यक्षमता आणि कमी कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, शाश्वत भविष्य घडविण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग धुरीण आणि संशोधक यांच्यातील सहकार्य मजबूत करेल याचा मनोहर लाल यांनी पुनरुच्चार केला.
“चक्राकार अर्थव्यवस्था ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नाही तर आर्थिक गरज आहे”.असे उदघाटनपर भाषणादरम्यान मंत्र्यांनी नमूद केले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर चक्राकार अर्थव्यवस्थेला पाठिंबा देत आहे यावर मनोहर लाल यांनी भर दिला.
कमी कार्बन उत्सर्जन, संसाधन-कार्यक्षम समाज निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत जैव-सीएनजी, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि ई-कचऱ्याच्या पुनर्वापरावर भारताचा भर असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
जयपूर जाहीरनामा (2025-2034)
संसाधन कार्यक्षमता आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने पुढील दशकाच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करणाऱ्या बिगर -राजकीय, बंधनकारक नसलेली बांधिलकी असलेला जयपूर जाहीरनाम्याचा (2025-2034) स्वीकार हा मंच करेल अशी घोषणा मनोहर लाल यांनी केली.

3आर भारतीय दालन - नवोन्मेषाचे प्रदर्शन
मनोहर लाल यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासमवेत 3आर भारतीय दालनाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमादरम्यान, शहरी शाश्वतता उपक्रमांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सीआयटीआयआयएस 2.0 साठी महत्त्वाच्या सामंजस्य करारावर (एमओयु) स्वाक्षरी करण्यात आली.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107820)
Visitor Counter : 23