गृह मंत्रालय
पैशाच्या हव्यासापोटी आपल्या युवकांना व्यसनाच्या अंधारमय वातावरणात ओढणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना शिक्षा करण्याबाबत मोदी सरकार कठोर असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे
Posted On:
02 MAR 2025 11:33AM by PIB Mumbai
पैशाच्या हव्यासापोटी आपल्या युवकांना व्यसनाच्या अंधारमय वातावरणात ओढणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांना शिक्षा करण्याबाबत मोदी सरकार कठोर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
एक्स समाज माध्यमावर एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त भारताच्या निर्मितीसाठी सरकार निष्पक्ष आणि दक्ष तपासणीसह अंमली पदार्थांच्या संकटाचा सामना करत राहण्यासाठी वचनबद्ध आहे.
खालच्या स्तरापासून वरपर्यंत आणि वरपासून खालच्या स्तरापर्यंत रणनीती अवलंबत सखोल तपासाच्या परिणामस्वरूप 29 अंमली पदार्थ तस्करांना देशभरातील 12 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ही 12 प्रकरणे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या विभागवार पुढीलप्रमाणे आहेत:-
अहमदाबाद विभाग
भोपाळ विभाग (मंदसौर)
चंदीगड विभाग
कोचीन विभाग
डेहराडून विभाग
दिल्ली विभाग
हैदराबाद विभाग
इंदोर विभाग
कोलकाता विभाग
लखनौ विभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अवलंबलेल्या 'बॉटम टू टॉप' आणि 'टॉप टू बॉटम' या दृष्टिकोनाचा दाखला म्हणून हे यश प्राप्त झाले आहे. अंमली पदार्थांविरुद्ध मोदी सरकारच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा पाठपुरावा करताना, अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) हे महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
या आरोपपत्रांमुळे न्यायालयांसमोर दाखल केलेल्या खटल्यांची यशस्वी कार्यवाही सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने NCB च्या समर्पित वृत्तीचे उदाहरण स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत नशा मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली NCB अथक परिश्रम करत आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत NCB ला लोकांचे समर्थन हवे आहे. NCB च्या MANAS हेल्पलाइन क्रमांक 1933 वर अंमली पदार्थांच्या तस्करीची माहिती गोपनीयरित्या दिली जाऊ शकते.
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107517)
Visitor Counter : 40