Posted On:
27 FEB 2025 8:29PM by PIB Mumbai
मुंबई, 27 फेब्रुवारी 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) आणि डान्सिंग एटम्स (एलए आणि भारतातील क्रिएटीव स्टुडिओ) यांनी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (वेव्हज), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा एक भाग म्हणून, ॲनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (एएफसी), ही मास्टरक्लासची विशेष मालिका आयोजित केली आहे. मालिकेतील विजेत्यांना जागतिक मान्यता, या क्षेत्रातील आघाडीच्या व्यावसायिकांकडून मार्गदर्शन आणि निधी सहाय्य आणि वितरणाची संधी मिळेल.

एएफसी ही स्पर्धा स्वतंत्र निर्माते, विद्यार्थी आणि स्टुडिओसाठी त्यांचे ॲनिमेटेड लघुपट प्रदर्शित करण्यासाठी खुली आहे. या मालिकेत या उद्योगातील आघाडीचे तज्ञ पटकथा लेखन, चित्रपट संरेखन, निर्मिती, कथाकथन, ॲनिमेशन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दलचा आपला दृष्टीकोन मांडतील.
मास्टरक्लासचे वेळापत्रक आणि आगामी सत्रांचे तपशील:
मार्च 3 - ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती
वक्ता: शोबू यारलगड्डा (निर्माता, बाहुबली मालिका)
o ठळक मुद्दे: व्यापक प्रभाव पडणाऱ्या चित्रपटांची उभारणी, वित्तपुरवठा आणि निर्मिती.
o झूमद्वारे सहभागासाठी लिंक :
https://us06web.zoom.us/j/87875515586?pwd=rBBuTksjMQzVw4if3hEIc71Hg1nFMB.1
मार्च 4 - जागतिक प्रेक्षकांसाठी चित्रपट निर्मिती
वक्ता: गुनीत मोंगा (ऑस्कर पुरस्कार प्राप्त निर्माते)
o ठळक मुद्दे: भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसे पोहोचवता येईल; सह-उत्पादन, वित्तपुरवठा आणि वितरण.
o झूमद्वारे सहभागासाठी लिंक :
https://us06web.zoom.us/j/87875515586?pwd=rBBuTksjMQzVw4if3hEIc71Hg1nFMB.1
मार्च 5 (टीबीसी) – कॅरेक्टर ॲनिमेशन अँड वर्ल्ड-बिल्डिंग
वक्ता: अर्नाउ ओले लोपेझ (अनिमेशन तज्ञ)
o ठळक मुद्दे: पात्रावर आधारित कथाकथन शैली समजून घेणे आणि निर्मिती
o झूमद्वारे सहभागासाठी लिंक :
https://us06web.zoom.us/j/88513001690?pwd=ac2Ra8475uuWBQrt7CCiXjgYsZpOhA.1
मार्च 6 - विविध माध्यमांतून कथाकथन
वक्ता : अनु सिंह चौधरी (पटकथा लेखिका आणि पत्रकार)
o ठळक मुद्दे: चित्रपट, मालिका आणि पुस्तकांसाठी पटकथा तंत्र आणि कथाकथन
o झूमद्वारे सहभागासाठी लिंक :
https://us06web.zoom.us/j/87830821165?pwd=AdPFfRBzlyuauTKblJt2brbWQGlmzL.1
यापूर्वी 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी दोन मास्टरक्लास सत्रे आयोजित करण्यात आली होती. 26 फेब्रुवारी रोजी लेखक आणि पटकथा तज्ज्ञ फारुख धोंडी यांनी स्क्रीनरायटिंग आणि ट्रेलर्स या विषयावरील सत्राला मार्गदर्शन केले. त्यांनी कथाकथन, स्क्रीनरायटिंग आणि लेखन व्यवसाय याबद्दलचा आपला दृष्टीकोन मांडला.
27 फेब्रुवारी रोजी प्रॉडक्शन डिझायनर आणि व्हिज्युअल आर्टिस्ट रुपाली गट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिल्म डिझाईन अँड व्हिज्युअल डेव्हलपमेंट’, या विषयावरील सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यांनी यावेळी अॅनिमेशन आणि लाइव्ह-अॅक्शन प्रकल्पांसाठी चित्तवेधक आभासी जग निर्माण करण्याविषयीचा व्यावहारिक दृष्टीकोन मांडला.
नेटवर्किंग आणि प्रकल्प सादरीकरण
वेव्हज (WAVES) उपक्रम भारतीय चित्रपट निर्मात्यांना त्यांचे प्रकल्प ‘वेव्हज बझार’ या जागतिक बाजारपेठेत सादर करण्यासाठी प्रोत्साहन देतो, जी भारतातील सर्वोत्तम सृजनशील प्रतिभा प्रदर्शित करणारी जागतिक बाजारपेठ आहे. हा उपक्रम भारतीय आशयसंपन्न सामग्रीला आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी जोडतो, तसेच नेटवर्किंग, सहयोग आणि जागतिक संधींना प्रोत्साहन देतो. अधिक माहितीसाठी, संपर्क साधा: waves@dancingatoms.com
वेव्हज (WAVES)
1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईमध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्वाचा टप्पा ठरणारी पहिली ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (WAVES), म्हणजेच जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक असाल, गुंतवणूकदार असाल, किंवा निर्माते अथवा नवोन्मेशी असाल, तर ही शिखर परिषद एकमेकांशी जोडायला, सहयोग, नावोन्मेष यासाठी तसेच एम अँड ई परिप्रेक्ष्यामध्ये योगदान देण्यासाठी अनोखे जागतिक व्यासपीठ प्रदान करेल.
आपल्या प्रश्नांना येथे उत्तर मिळेल:
चला तर, वेव्हसाठी त्वरित नोंदणी करा (लवकरच येत आहे!).
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com