सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
विकसित भारतासाठी डेटा-चलित अंतर्दृष्टीकोन बाळगत तरुणांना सक्षम करण्यासाठी 'इनोवेट विद जीओआईस्टेट्स' हॅकेथॉन ची सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने केली घोषणा
Posted On:
25 FEB 2025 12:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मायजीओव्हीच्या सहकार्याने, विकसित भारतासाठी डेटा-चलित अंतर्दृष्टीकोन बाळगत तरुणांना सक्षम करण्यासाठी 'इनोवेट विद जीओआईस्टेट्स' हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे (नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस,NSO) तयार केलेल्या व्यापक अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून डेटा आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना तयार करण्यासाठी भारतातील तरुण आणि तेजस्वी मनांना - विद्यार्थी आणि संशोधकांना प्रेरणा देणे हे या हॅकेथॉनचे उद्दिष्ट आहे.
हॅकेथॉन सहभागींना अहवाल, मायक्रोडेटा आणि मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या इतर डेटासेटमधून अधिकृत आकडेवारीचे अन्वेषण करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी आमंत्रित करेल, उदाहरणार्थ पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (पीएलएफएस), घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षण (एचसीईएस), उद्योगसमूहांचे वार्षिक सर्वेक्षण (जीसीपीआय), ग्राहक किंमत सूचकांक (डीओसीपीआय), घाऊक ग्राहक उत्पादने (GDP) आणि इतर बाबी ज्यावर विकसित भारताच्या प्रवासात पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला समर्थन देण्यासाठी प्रभावी सादरीकरण तयार करता येईल. डेटा-चलित धोरण अंतर्दृष्टीसाठी एक मजबूत पाया तयार करताना सहभागी अधिकृत आकडेवारीसह प्रत्यक्ष अनुभवही मिळवू शकतात.
MyGov प्लॅटफॉर्मवर 25 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत ही हॅकेथॉन होणार आहे. पदवीपूर्व, पदव्युत्तर किंवा संशोधन करत असलेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ परिक्षकांच्या समितीद्वारे निवडलेल्या उत्तम 30 प्रवेशांना 2 लाख रुपयांचे पहिले बक्षीस, त्यानंतर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे दोन द्वितीय बक्षिसे, प्रत्येकी ₹50,000 ची दोन तृतीय बक्षिसे आणि प्रत्येकी 20,000 रुपयांची पंचवीस उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर केली आहेत.
‘GoISstats मधे नाविन्यपूर्ण संकल्पनांसह’ मध्ये सहभागी व्हा - जिथे डेटाला विशेष दृष्टी मिळते .
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी, कृपया लिंक पहा:
https://innovateindia.mygov.in/goistats
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106043)
Visitor Counter : 18