युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिल्लीमध्ये फिक्की आणि सीआयआय सोबत फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाचे नेतृत्व केले


फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रम 4,200 ठिकाणी पोहोचला, सर्व वयोगटांतील नागरिकांना प्रेरणा

लठ्ठपणाच्या विरोधात देशाच्या लढ्यात भारतातील उद्योग क्षेत्र सहभागी

Posted On: 23 FEB 2025 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2025

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज राष्ट्रीय राजधानीत फिट इंडिया संडेज ऑन सायकल मोहिमेचे नेतृत्व केले. या उपक्रमात सायकलिंग क्लबच्या सदस्यांसोबत ऑलिम्पिक रोइंगपटू अर्जुन लाल जाट, उद्योग संस्था फिक्की आणि सीआयआय चे विशेष पाहुणे तसेच डेकॅथलॉन, योग भारत आणि माय भारत या फिटनेस ब्रँडचे प्रतिनिधी सहभागी झाले.

या उपक्रमाचा आज नववा आठवडा असून, तो आता देशव्यापी तंदुरुस्ती चळवळीत रूपांतरित झाला आहे. भारतभरातील 1200 पेक्षा अधिक ठिकाणी नागरिक या मोहिमेत उत्साहाने सहभागी होत आहेत. पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरोधात तेलाचे कमी सेवन, व्यायाम आणि आरोग्यदायी आहार घेण्याचे आवाहन केले होते. त्याच प्रेरणेतून डॉ. मांडविया यांनी हा उपक्रम देशाच्या लठ्ठपणाविरोधातील लढ्याला समर्पित केला.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री म्हणाले, "आदरणीय पंतप्रधानांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लठ्ठपणाविरोधी मोहिमेत आपल्याला दैनंदिन तंदुरुस्ती सवयींचा भाग करावा लागेल. सायकल चालवणे हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार असून तो वैयक्तिक आरोग्यासह पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम करतो. हे कार्बनचे उत्सर्जन कमी करते आणि प्रदूषणावर उपाय ठरते."

   

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रम प्रत्येक आठवड्याला लोकांच्या विशेष चमूला आमंत्रित करतो. गेल्या आवृत्त्यांमध्ये लष्करी कर्मचारी, टपाल कर्मचारी, आरोग्य तज्ज्ञ अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या आठवड्यात देशातल्या कॉर्पोरेटसने एक पाऊल पुढे येत मोहिमेत सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या महत्त्वाबाबत बोलताना, सीआयआय, स्पोर्टस्कॉमचे कोषाध्यक्ष विदुष्पत सिंघानिया म्हणाले, ‘‘हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी माननीय क्रीडामंत्र्यांचे अभिनंद करतो. निरोगी भारत हा अधिक यशस्वी भारत असेल, कारण चांगले आरोग्य थेट उच्च उत्पादकता आणि मजबूत सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये योगदान देऊ शकते. उद्योगसंस्था म्हणून, आम्ही अधिकारी कॉर्पोरेट्सना फिट इंडिया संडेज् ऑन सायकल मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि या महत्त्वपूर्ण चळवळीला पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करण्यास वचनबद्ध आहोत.’’

ऑलिम्पिक विजेता अर्जुन लाल जाट पुढे म्हणाले, “सहभागींचा उत्साह मोठा होता आणि मैदानी खेळाडू म्ङणून मला इतके सारे लोक रविवारी सकाळी बाहेर पडताहेत आणि तंदुरूस्तीसाठी वेळ काढतात हे पाहून मला आनंद होतो आहे. तंदुरूस्त राहाणे हा पर्याय नाही, ते प्रत्येकासाठी अनिवार्य आहे आणि फिट इंडिया संडेज् ऑन सायकल हा उपक्रम लोकांना त्यांच्या तंदुरुस्तीचा प्रवास सुरू करण्यासाठी अद्भुत प्रेरणा देणार आहे.”

   

गुवाहाटीमध्ये, साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रामध्ये, भारतीय वैद्यकीय संघटनेचे डॉक्टर फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या जल्लोषात सामील झाले होते. तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी 300 हून अधिक सदस्यांनी सायकल चालवली.

आजच्या 1200 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्याबरोबरच, गेल्या काही आठवड्यात, भारतातल्या 4200 ठिकाणी फिट इंडिया संडेज ऑन सायकलचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भौगोलिक प्रदेशातील, वयोगटातील आणि सामाजिक पार्श्वभूमीतील नागरिक या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याने संडेज ऑन सायकल्सच्या आयोजनांची ठिकाणे वाढत आहेत.

 

* * *

S.Patil/Nitin/Vijayalaxmi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2105651) Visitor Counter : 15