माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज प्रोमो व्हिडिओ चॅलेंज

Posted On: 21 FEB 2025 6:24PM by PIB Mumbai

तुमचा दृष्टिकोन शिखर संमेलनाच्या सिग्नेचर क्लिपमध्ये परिवर्तित करा!

परिचय

वेव्हज प्रोमो व्हिडिओ चॅलेंज हा क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग आहे. आगामी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 च्या भावनेला प्रतिबिंबित करणारे आकर्षक व्हिडिओ तयार करण्याचे निर्माते, दूरदर्शी आणि कथाकारांना हे आवाहन आहे." या, आमच्यासोबत चला" या संकल्पनेवर केंद्रित असलेले हे आव्हान सर्व स्तरातील सहभागींना आमंत्रित करते. दूरदर्शी दिग्दर्शक असो, सर्जनशील जाहिरातदार असो किंवा आघाडीचा प्रसारक असो, ही तुमच्यासाठी नवीन दृष्टिकोन मांडण्याची आणि तुमची सर्जनशीलता दाखवण्याची संधी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशन (आयबीडीएफ) द्वारे 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश वेव्ह्ज साठी पायाभूत सुविधा तयार करणे हा आहे.

वेव्हज, त्याच्या पहिल्या पर्वात, संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्राच्या अभिसरणासाठी सज्ज असलेला एक आगळावेगळा हब-अँड-स्पोक मंच आहे.

वेव्ह्ज चा एक प्रमुख उपक्रम असलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसने जगभरात 73,000 हून अधिक सहभागींना सहभागी करून घेतले आहे, ज्यामुळे एक सर्जनशील परिसंस्था निर्माण झाली आहे जिथे नवीन कल्पना साकारतात आणि कथाकथनाच्या मर्यादांचा सातत्याने पुनर्विचार होतो.

पात्रता निकष

  • लक्षित सहभागी: ही स्पर्धा भारत आणि जगभरातील सर्व सर्जनशील व्यावसायिक आणि इच्छुक रचनाकारांसाठी खुली आहे.
  • वयोमर्यादा: सहभागींचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
  • भौगोलिक व्याप्ती: भारत आणि परदेशातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
  • प्रयत्न: सहभागी अनेक प्रवेशिका पाठवू शकतात.
  • अस्सलता : सर्व सादरीकरणे या स्पर्धेसाठी विशेषतः तयार केलेल्या मूळ रचना असाव्यात. कोणत्याही प्रकारची साहित्यिक चोरी किंवा परवानगीशिवाय कॉपीराइट केलेल्या साहित्याचा वापर केल्यास अपात्र ठरवले जाईल.

सर्जनशील मार्गदर्शक तत्त्वे

संकल्पना

"या, आमच्यासोबत चला" या घोषवाक्याशी निगडित वेव्ह्ज 2025 च्या एकूण उद्दिष्टांशी आणि संकल्पनेशी सुसंगत प्रवेशिका असाव्या.

स्वरूप/कालावधी

सहभागींनी तीन प्रकारात प्रसारण दर्जाचे व्हिडिओ तयार करावेत: 1 मिनिट, 30 सेकंद आणि 15 सेकंद, जे 50 एमबीपेक्षा कमी आकाराचे MP4, MOV, WMV किंवा AVI फाइल्स म्हणून सादर केले जातील.

भाषा

सर्व सादरीकरण इंग्रजीत असले  पाहिजे.

तांत्रिक आवश्यकता

उच्च डेफिनेशन/प्रसारण दर्जाचे ऑडिओ आणि व्हिज्युअल घटक सुनिश्चित करा. कमी दर्जाची सादरीकरणे अपात्र ठरवली  जातील.

ब्रँडिंग घटक

प्रोमो व्हिडिओमध्ये वेव्हज इव्हेंट ब्रँडिंग मटेरियल समाविष्ट असले पाहिजे, जे स्पर्धेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

कालमर्यादा

मूल्यांकन निकष

  • मौलिकता आणि सर्जनशीलता
  • संकल्पनेशी सुसंगत
  • निर्मिती गुणवत्ता
  • कथनात्मक प्रभाव
  • ब्रँडिंग एकत्रीकरण

पारितोषिक आणि मान्यता

सर्वोच्च 5 सादरीकरणाना रोख पारितोषिके आणि त्यांच्या निर्मात्यांचा सर्व खर्च  करत त्यांना वेव्ह्ज 2025 मध्ये सहभागाची संधी मिळेल.

निष्कर्ष

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 च्या पहिल्या पर्वात योगदान असलेल्या वेव्हज प्रोमो व्हिडिओ चॅलेंज क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसद्वारे निर्मात्यांना जागतिक स्तरावर त्यांची सर्जनशीलता दर्शविण्याची एक उल्लेखनीय संधी लाभते.

संदर्भ:

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105431) Visitor Counter : 14