श्रम आणि रोजगार मंत्रालय
डिसेंबर 2024 मध्ये 17.01 लाख नव्या कामगारांनी ईएसआय योजनेमध्ये केली नोंदणी
नव्या नोंदण्यांमध्ये 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 8.22 लाख तरुण कर्मचाऱ्यांचा समावेश
Posted On:
21 FEB 2025 4:12PM by PIB Mumbai
ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वेतनपट विषयक तात्पुरत्या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, डिसेंबर 2024 या महिन्याभरात 17.01 लाख नव्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे सदस्यत्व स्वीकारले.
डिसेंबर 2024 मध्ये 20,360 नव्या आस्थापनांना ईएसआय योजनेच्या सामाजिक सुरक्षा परिघात समाविष्ट करण्यात आले त्यामुळे अधिक कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेची सुनिश्चिती झाली.
महामंडळाकडून जारी आकडेवारीवरून असे आढळून येते की,डिसेंबर महिन्यात या योजनेत नोंदणी झालेल्या एकूण 17.01 लाख कर्मचाऱ्यांपैकी 48.35 % म्हणजेच 8.22 लाख कर्मचारी 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
तसेच वेतनपटातील आकडेवारीच्या लिंग-निहाय विश्लेषणावरुन असे दिसते की डिसेंबर 2024 मध्ये एकूण 3.46 लाख महिला सदस्यांनी या योजनेत नोंदणी केली. त्याशिवाय, एकूण 73 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनी देखील डिसेंबर 2024 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत सहभागासाठी नोंदणी केली. समाजाच्या प्रत्येक घटकाला या योजनेचे लाभ मिळण्याप्रती ईएसआयसीची कटिबद्धता यातून सिध्द होते.
ही वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण आकडेवारी गोळा करणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2105331)
Visitor Counter : 28