माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ए आय अवतार निर्मिती
Posted On:
20 FEB 2025 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025
कल्पना सत्यात उतरविणे
आभासी विश्वात ए आय अवतार बदल घडवून आणत आहे. माणसांसारखे दिसणारे कृत्रिम प्रज्ञा संचालित डिजिटल व्यक्तिमत्व कर्मचारी म्हणून वैयक्तिक आणि परस्पर संवादी मानवी प्रभावकांसारखे आभासी विश्वात सामावून गेले आहेत. हे तंत्रज्ञान जसे प्रगत होत जात आहे, तसतसे विपणन, आशय निर्माण, आणि मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अवतार हे हळूहळू शक्तिशाली साधन बनू लागले आहे. माहिती आणि प्रसारण विभाग तसेच AVTR Meta Labs यांनी AI Avatar Creator Challenge आयोजित केले आहे ज्यासाठी ए आय अवतार या कल्पनेच्य अमर्यादित शक्यता शोधता येणाऱ्या संशोधकांना आमंत्रित केले आहे.आत्तापर्यंत यासाठी 1,251 जणांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे यामध्ये 102 आंतरराष्ट्रीय आमंत्रित आहेत.

क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस सीझन 1 चा हा एक भाग आहे आणि वेव्ह ज (world audio visual and entertainment summit ) पिलर 2 या एव्हीजीसी -एक्स आर यामध्ये त्याचा समावेश होतो. जिओ वर्ड कॉन्व्हेन्शन सेंटर आणि मुंबईतील जिओ वर्ड गार्डन्स या ठिकाणी 1 मे ते 14 मे 2025 या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
वेव्हज हा पहिला मंच आहे जो माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाला पुढे नेत यशाच्या नव्या उंचीवर देऊन ठेवत आहे. प्रसारण आणि माहितीवजा मनोरंजन, एव्हीजीसी -एक्स आर डिजिटल माध्यमे आणि संशोधन तसेच चित्रपट या चार मुख्य तत्वांवर वेव्हज आधारित आहे.
एआय अवतार क्रिएटर चॅलेंज हे ज्यामध्ये ऑगमेंटेड रिआलिटी वर्च्यूअल रिआलिटी आणि मेटावर्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणाऱ्या एव्हीजीसी -एक्स आर पिलर बरोबर संलग्न आहे.
एआय अवतार क्रिएटर चॅलेंज कडे धाव घेण्या आधी पुढील महत्त्वाचे तपशील बघून घ्यावेत.
सहभागीताचे वय किमान 18 वर्षे असायला हवे आणि त्याने वयाच्या पडताळणीसाठी वैध ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.
ही स्पर्धा जगभरातल्या क्रियेटर साठी खुली आहे आणि तुम्ही ए आय अवतार च्या एकाहून अधिक प्रवेशिका पाठवू शकता फक्त प्रत्येक प्रवेशिका ही संपूर्णपणे एआय उत्पादित आणि एकमेव नाव तसेच तपशील असलेली हवी.
सहभाग घेताना तुम्ही तयार केलेला एआय अवतार हे तुमची मूळ निर्मिती असायला हवे आणि त्याने प्रत्यक्षातल्या किंवा कुठल्याही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेलचा अधिकार भंग करता कामा नये. एखाद्या कामाची नक्कल किंवा परवानगीशिवाय एखाद्या इतर व्यक्तिमत्वाची नक्कल उतरवली असेल तर त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
नोंदणी प्रक्रिया

सहभागींनी या स्पर्धेसाठी अवतार मेटा लॅबच्या संकेतस्थळावरून नोंदणी करावी. संकेतस्थळावरील Register interest हे बटन दाबून तुमचे नाव संपर्कसाठी माहिती संकल्पना आणि तुमच्या AI AVATAR चा उद्देश नोंदवून तपशील भरा. अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या अटी आणि नियम यांचा आढावा जरूर घ्या.
या आव्हानासाठी 28 फेब्रुवारी 2025 ही कालमर्यादा आहे.
मूल्यमापनाचे निकष

AI Avatar Creator Challenge चे मूल्यमापन तज्ञ समितीकडून केले जाईल चे प्रत्येक एन्ट्री महत्त्वाच्या निकषांवर तपासतील. सूक्ष्म तपशील तंत्रज्ञान आणि उद्दिष्ट या तीन प्रमुख तत्त्वांवर मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक निर्मात्याला या तीन श्रेणीमध्ये दिले जाते आणि प्रत्येक सहभागी ला संपूर्ण गुण सांगितले जातील.
पारितोषिक
सहभागींना पहिल्या अंतिम दहा नंतर सर्वात उच्च स्तरावरील तीन स्पर्धकांना , Waves 2025 शिखर परिषदेत त्यांचे काम सादर करता येईल. विजेत्या स्पर्धाकाला एक लाख रुपये रोख पारितोषिक मिळेल आणि सर्वात वरच्या दहा भागाचे प्रमाणपत्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्राप्त होईल.

विजेता कितवा पहिला राहणारा सहभागींना त्यांचा ए आय अवतार आणि त्यांचे कल्पना समाज माध्यम वाहिन्यांवर , विपणन साधनांवर आणि ऑनलाईन मंचावर अनंत काळ वापरता येईल.
संदर्भ -
Kindly find the pdf file
S.Bedekar/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105169)
Visitor Counter : 23