माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिटीक्वेस्टः शेड्स ऑफ भारत

Posted On: 20 FEB 2025 5:00PM by PIB Mumbai

भारताच्या शहरी विकासाला जिवंत करणारा पत्त्यांचा खेळ

परिचय

वेव्हज सिटी क्वेस्टः शेड्स ऑफ भारत हा एक नावीन्यपूर्ण शैक्षणिक खेळ आहे जो भारताच्या शहरी विकासाला मजेशीर आणि सातत्यपूर्ण संवादाच्या माध्यमातून जिवंत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर नियोजनाच्या दृष्टीकोनाला अनुसरून तयार करण्यात आलेला हा खेळ नीती आयोगाने निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबाबत(SDGs) खेळाडूंना शिक्षण देतो.  

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मदतीने ई-गेमिंग फेडरेशनने(EGF) तयार केलेल्या पत्त्यांच्या या खेळात खेळाडू स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख विकास निर्देशाकांच्या आधारे भारतातील 56 शहरांची तुलना करू शकतात. शहरांच्या क्षमतांच्या आधारे गुण मिळवण्यासाठी स्पर्धा करून खेळाडूंना आपल्या बालपणातील पत्त्यांच्या खेळांच्या आठवणीने मन हलके होण्याबरोबरच शहरी आव्हाने आणि प्रगती यांची माहिती देखील मिळते.15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सिटीक्वेस्टसाठी तब्बल 1920 सहभागींनी नोंदणी केली आहे.

सिटीक्वेस्टः शेड्स ऑफ भारत हा जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदे(वेव्हज) अंतर्गत क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसचा एक महत्त्वाचा घटक आहे

1 ते 4 मे 2025 या कालावधीत  मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे होणारी  जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद,वेव्ह्ज माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला एका नव्या उंचीवर नेणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम असेल. प्रसारण आणि इन्फोटेन्मेंट, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेट रियालिटी (AVGC-XR),डिजिटल मिडिया आणि नवोन्मेष आणि फिल्म्स या चार प्रमुख स्तंभांवर उभारलेली आहे. हे आव्हान स्तंभ 2- AVGC-XR अंतर्गत येत असून  कथानकाच्या अनुभूतीचा सखोल अनुभव देणारे कथाकथन आणि प्रत्यक्ष संवादात्मक अनुभव यांच्याशी संबंधित आहे. तंत्रज्ञानाचे नवोन्मेषासोबत मिश्रण करून हा स्तंभ गेमिंग, ऍनिमेशन आणि एक्स्टेंडेड रियालिटीमधील प्रगतीचे दर्शन घडवतो आणि उद्योग धुरीण आणि हितधारकांना शोध घेण्यासाठी नवी क्षेत्रे उपलब्ध करून देतो. 73 हजारांपेक्षा जास्त नोंदणीसह क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस  या उपक्रमाने विविध क्षेत्रातील आकांक्षी आणि व्यावसायिक आशयनिर्मात्यांना सहभागी करून नवोन्मेष आणि सृजनशीलतेला चालना दिली आहे.

पात्रता आणि सहभागाची कालमर्यादा

सिटी क्वेस्ट गेम (शहर प्रश्नमंजुषा स्पर्धा) सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुला आहे.

स्पर्धेचा कालावधी 25 ऑक्टोबर 2024 ते 25 एप्रिल  2025

विजेत्या स्पर्धकांना वेव्हज 2025 कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

कसे खेळायचे: सिटी क्वेस्टचे नियम

स्पर्धक खेळाडू विरुद्ध विश्वकर्मा (एआय): खेळाडू आणि विश्वकर्मा (एआय) यांना एकूण 56 सिटी कार्ड्समधून कोणत्याही क्रमाने निवडलेल्या 11 कार्ड्सचा डेक मिळतो.

डील : खेळाच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंना उलट बाजू केलेली 11सिटी कार्ड दिली जातात.

कार्ड उघड करणे: प्रत्येक फेरीत, खेळाडू आणि एआय दोघेही त्यांच्या संबंधित डेकमधून टॉप सिटी कार्ड उघड करतात. मागची  फेरी जिंकणारा खेळाडू प्रथम तुलना मापदंड निवडतो.

तुलना: प्रत्येक कार्डमध्ये स्वच्छता, लोकसंख्या आणि शिक्षण असे 6 मापदंड असतात. खेळाडू एआयच्या कार्डशी तुलना करण्यासाठी एक मापदंड निवडतो.

गुणमापन: एक डाव जिंकल्याबद्दल +1 गुण, बरोबरी झाल्यास (टायसाठी) +0.5 (अर्धा) गुण आणि सलग विजयांसाठी अतिरिक्त +0.5 (अर्धा) गुण मिळवा.

खेळ जिंकणे: 11 फेऱ्यांनंतर, सर्वाधिक एकूण गुण मिळवणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित केले जाते.

बक्षीस श्रेणी

प्रादेशिक विजेते- प्रत्येक चार प्रदेशातील दोन विजेते म्हणजे एकूण आठ विजेते

दिव्यांग श्रेणी- दोन विजेते

सशस्त्र दल श्रेणी- दोन विजेते (सध्या सेवेत असलेले किंवा निवृत्त)

लीडरबोर्ड (गुणतालिका) आढावा

एकदा गेम संपला की, गुण डायनॅमिक लीडरबोर्डवर अपडेट केले जातात. लीडरबोर्डचे तीन प्रकार आहेत:

राष्ट्रीय गुणतालिका

खेळाडूंना देशभरातील अन्य सर्व सहभागींमध्ये क्रमवारी दिली जाते, जे त्यांचे एकूण गुण दर्शवितात.

शहरानुसार गुणतालिका

एकाच शहरातील खेळाडू परस्परांशी स्पर्धा करतात आणि त्यांच्या एकूण गुणांनुसार क्रमवारी ठरवली जाते.

आंतरशहर गुणतालिका

शहरांची आपापसात स्पर्धा होते आणि प्रत्येक शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंच्या एकत्रित गुणांच्या आधारे क्रमवारी ठरवली जाते.

संदर्भ:

पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

S.Kane/S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2105018) Visitor Counter : 25