आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींसाठी 100% कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी व्यापक विशेष एनसीडी मोहीम केली सुरु
Posted On:
20 FEB 2025 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025
देशातील असंसर्गजन्य रोगांचे (एनसीडी) वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आजपासून एक विशेष एनसीडी मोहीम सुरू केली आहे. 20 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या,या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे उद्दिष्ट,30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींसाठी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मौखिक, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असे तीन कर्करोग यासह प्रचलित असंसर्गजन्य रोगांची 100% तपासणी करणे यांचा समावेश आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि विविध आरोग्य सुविधांद्वारे, अशा असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहिमेतील प्रमुख ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
• घरोघरी पोहोचणे: प्रशिक्षित आशा (ASHAs), परिचारिका (ANM) आणि आघाडीवर काम करणारे कर्मचारी समुदायांच्या भेटी घेत त्या घरांतील व्यक्तींपर्यंत पोहोचतील, जेणेकरून अशा रोगांची जास्तीत जास्त प्राथमिक चाचणी करणे सुनिश्चित होईल.
• अत्यावश्यक पुरवठा: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सर्व आरोग्य सेवा केंद्रांवर रक्तदाब मॉनिटर्स, ग्लुकोमीटर आणि आवश्यक औषधांसह आवश्यक वैद्यकीय सुविधांचा पुरवठा उपलब्ध आहे याची हमी देतील.
•प्रत्यक्ष देखरेख (रिअल-टाइम मॉनिटरिंग): या मोहिमेची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करत प्राथमिक तपासणी,उपचार आणि फॉलो-अप्स यांची माहिती दररोज NP-NCD पोर्टलवर अपलोड केली जाईल.
• बहु-स्तरीय समन्वय: मोहिमेच्या विना व्यत्यय अंमलबजावणीसाठी, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुविधा केंद्रांवर नोडल अधिकारी नियुक्त केले जातील.
• दैनंदिन प्रगतीचा आढावा: प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालयाला दररोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभरातील घडामोडींची अद्ययावत माहिती देतील,ज्यामुळे सतत देखरेख ठेवून तांत्रिक सहाय्य मिळू शकेल.

या महत्त्वाच्या प्रार्थमिक तपासणी (स्क्रीनिंग) मोहिमेचे उद्दिष्ट पुढील गोष्टी साध्य करणे आहे:
• 100% लोकांपर्यंत पोहोचणे(स्क्रीनिंग कव्हरेज): या मोहिमेचे उद्दिष्ट एनसीडीची लक्षणे लवकरात लवकर शोधणे आणि वेळेवर उपाययोजना सुनिश्चित करणे हे आहे.
• काळजीसाठी सुधारित लिंकेज: व्यवस्थित उपचार आणि फॉलो-अपसाठी आचारसंहिता सुनिश्चित करून, या मोहीमेद्वारे एनसीडीशी संबंधित गुंतागुंत कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
• उत्तम आरोग्य परिणाम: या उपक्रमामुळे आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होईल आणि देशभरातील व्यक्तींच्या जीवनाचा एकूण दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आहे.

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104940)
Visitor Counter : 60