माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजेसाठी वेव्ह्ज 2025 च्या व्यासपीठावर 'रिझोनेट: द ईडीएम चॅलेंज' चे आयोजन


'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'मध्ये संगीत अभ्यासकांच्या ईडीएम शैलीच्या प्रतिभेचा अविष्कार

सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2025

Posted On: 18 FEB 2025 9:20PM by PIB Mumbai

मुंबई, 18 फेब्रुवारी 2025

जर आपण इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माता असाल आणि आपल्यात डीजे बनण्याचे गुण असतील, तर मग WAVES (वेव्ह्ज) 2025, म्हणजेच जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद , हे आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ ठरेल!

भारतीय संगीत उद्योगाने (आयएमआय) केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने, 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'चा एक भाग म्हणून, 'रिझोनेट: द ईडीएम चॅलेंज' ही स्पर्धा आयोजित केली  आहे, जी ऑडिओ, व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या जगात आपली सृजनशील प्रतिभा आणि नवोन्मेष प्रदर्शित करण्याची अनोखी संधी प्रदान करते. म्युझिक फ्यूजन, इलेक्ट्रॉनिक म्युझिक आणि डीजेईंगची कला याचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे, हे या स्पर्धेचे उदिष्ट आहे.

'रिझोनेट: द ईडीएम चॅलेंज' ही स्पर्धा वैयक्तिकपणे भाग घेणारे कलाकार आणि सृजनशील  टीमसाठी खुली असून, त्यांना या उद्योगातील तज्ञ, भारतीय संगीताचे श्रोते आणि जागतिक प्रेक्षकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करता येईल, आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक संगीताच्या ध्यासाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देता येईल.

हे व्यासपीठ उदयोन्मुख आणि अनुभवी संगीतकारांसाठी खुले असून त्यांना उत्कंठावर्धक दोन टप्प्यांच्या स्पर्धेत सहभागी होता येईल.

• प्राथमिक फेरी: सहभागी त्यांचे मूळ ईडीएम ट्रॅक ऑनलाईन सादर करतील. उद्योगातील तज्ञांचे पॅनेल त्याचे मूल्यांकन करतील आणि सर्वोत्तम 10 प्रवेशिका शॉर्टलिस्ट करतील.

• अंतिम फेरी: अंतिम फेरीतील स्पर्धक वेव्ह्ज 2025 मध्ये थेट सादरीकरण करतील आणि सर्वोच्च सन्मानासाठी प्रतिष्ठित ज्युरी आणि जागतिक प्रेक्षकांसमोर स्पर्धेत सहभागी होतील.  

विजेत्यांना रोख बक्षिस (अंतिम विजेत्याला ₹2,00,000 आणि उपविजेत्याला ₹50,000) प्रदान केले जाईल, तसेच जाहिरात सामग्रीमध्ये काम करण्याची, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळविण्याची आणि जागतिक व्यासपीठावर आपली कला प्रदर्शित करण्याची संधी दिली जाईल.

चॅलेंजबद्दल सविस्तर माहितीसाठी, कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या:

https://indianmi.org/resonate-the-edm-challenge/

स्पर्धेचे नियम आणि अटी जाणून घेणे महत्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व निकष याविषयी सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक पहावी:

Terms and Conditions.

सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2025 आहे. स्पर्धेतील सहभागासाठी  पुढील पत्त्यावर ईमेल पाठवावा: wavesatinfo@indianmi.org. सहभागींनी त्यांच्या सहभागाचे  तपशील नोंदवण्यासाठी त्यासाठी प्रदान करण्यात आलेल्या टेम्पलेटचा वापर करणे आवश्यक आहे, जो पुढील लिंक वर पाहता येईल: Submission Template.

WAVES (वेव्ह्ज) 2025:

वेव्ह्ज 2025 ही जागतिक शिखर परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली असून, प्रसारमाध्यमे, मनोरंजन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नवोन्मेष, सृजनशीलता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि एक्सआर (एक्सटेंडेड रिअॅलिटी) यामध्ये नवीन संधी शोधण्यासाठी, वेव्ह्ज परिषद निर्माते, या उद्योगातील नेतृत्व आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणेल. एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रात भारताला जागतिक महासत्ता म्हणून स्थान देण्याच्या दृष्टीकोनातून, वेव्ह्ज 2025 कौशल्य विकास, उद्योजकता आणि सीमापार सहकार्याला प्रोत्साहन देते.

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104522) Visitor Counter : 27