आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाकडून पंतप्रधान योग पुरस्कार 2025 साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा
Posted On:
16 FEB 2025 6:04PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त प्रतिष्ठेच्या `पंतप्रधान योग पुरस्कार 2025` साठी नामांकन प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे पुरस्कार योग प्रचार आणि विकासासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केले जातात.
राष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, राष्ट्रीय संस्था श्रेणी, आंतरराष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, आंतरराष्ट्रीय संस्था श्रेणी या प्रकारांमध्ये पुरस्कार दिले जातील. प्रत्येक विजेत्यास चषक, प्रमाणपत्र आणि रु. 25 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान केले जाईल. वैयक्तिक अर्जदार किमान 40 वर्षे वयाचे असावेत. त्यांनी योग प्रचार आणि सेवेमध्ये किमान 20 वर्षे सातत्यपूर्ण कार्य केलेले असावे, अशी अर्जासाठीची पात्रता आहे.
नामांकन आणि अर्ज मायगव्ह - MyGov प्लॅटफॉर्मवर (https://innovateindia.mygov.in/pm-yoga-awards-2025/) 31 मार्च 2025 पर्यंत सादर करता येतील. ही लिंक आयुष मंत्रालयाच्या आणि त्याच्या स्वायत्त संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध असेल.
संस्था स्वतः अर्ज करू शकतात किंवा एखाद्या प्रसिद्ध योग संस्थेच्या शिफारशीनुसार नामांकित होऊ शकतात. प्रत्येक अर्जदार / नामांकित व्यक्ती दरवर्षी केवळ एका श्रेणीसाठी (राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय) अर्ज करू शकते.
आयुष मंत्रालयाद्वारे स्थापन छाननी समिती सर्व अर्जांचे पुनरावलोकन करून प्रत्येक श्रेणीतील जास्तीत जास्त 50 उमेदवारांची निवड करेल. त्यानंतर मूल्यमापनसमिती या अर्जांचा अंतिम आढावा घेईल. परीक्षकांमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचा समावेश असेल आणि तीच अंतिम निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असेल.
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103853)
Visitor Counter : 41