माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रील मेकर्स आणि व्यावसायिक जाहिरातपट निर्मात्यांना सेलिब्रिटी म्हणून चमकण्याची वेव्ह्ज मध्ये सुवर्णसंधी
Posted On:
12 FEB 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
अॅनिमेशनला प्रोत्साहन देणाऱ्या असिफा इंडिया या युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगातून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांचे आयोजन केले आहे. हे पुरस्कार अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर) मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणार असून याद्वारे जागतिक स्तरावर भारताचे सर्जनशील नेतृत्व बळकट होईल.

पुरस्कारांबद्दल
स्पर्धेचे दोन प्रकार आहेत: विद्यार्थी शोरील्स (वेळेचे कोणतेही बंधन नाही) आणि व्यावसायिक जाहिरातपट (मर्यादा 60 सेकंद). या प्रवेशिकांमधून भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक पटलावरील विषय आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रतिबिंबित होते जसे की:
· आधुनिक संदर्भात पौराणिक कथा आणि लोककथा
· शाश्वतता आणि हवामान बदल जागरूकता
· निरामयता आणि योग
· कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कथाकथनाचे भवितव्य
· अॅनिमेशन आणि व्हीएफएक्सद्वारे भारताच्या अकथित कथा
· सामाजिक प्रभावासाठी गेमिंग
· व्हर्च्युअल उत्पादन आणि एक्सआर नवोन्मेष
· स्टॉप मोशन अॅनिमेशन वापरून हनुमान चालिसा सारख्या पौराणिक कथांचे अॅनिमेशन
· महिला सुरक्षा आणि छेडछाड
· जाहिरात विश्व आणि त्याचे बदलते परिमाण
असिफा इंडियाला उत्साही सहभागासह अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.
असिफा इंडियाला विविध स्तरातील लोकांकडून 1238 सर्जनशील कलाकृतीसह भरघोस प्रतिसाद मिळाला आहे: यात विद्यार्थी (75%), व्यावसायिक (25%), महिला (35%) आणि उदयोन्मुख निर्माते (50%) आहेत. महिला आणि तरुण निर्मात्यांचा सहभाग हा भारताच्या एव्हीजीसी क्षेत्रातील विविधता, समावेशकता आणि नवीन दृष्टिकोनांना प्रोत्साहन देण्याच्या आव्हानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो.
विविध खंडांमधून प्रवेशिकांना प्रोत्साहन देण्यात आले आहे, ज्यामुळे स्पेन, इंग्लंड, अमेरिका, ग्रीस, सायप्रस, इराण, फिनलंड, फिलीपिन्स, जर्मनी, श्रीलंका, प्यूर्टो रिको, चीन आणि मेक्सिको अशा 13 देशांमधून 60 हून अधिक जागतिक प्रवेशिका आल्या आहेत. ग्लोबल अॅनिमेटेड फिल्म असोसिएशन असिफा (असोसिएशन इंटरनॅशनल डू फिल्म डी'अॅनिमेशन) विविध काउंटींमध्ये त्यांच्या 40 विभागाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धेचा प्रचार करत आहे.
असिफा ला भारत आणि परदेशातील 52 हून अधिक संस्थांकडून देखील प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार प्रवेशिकांची झलक

वेव्हज विजेत्यांना जागतिक संधी मिळतात
विजेत्यांना तज्ञांकडून पोर्टफोलिओ पुनरावलोकनासाठी वैयक्तिक समर्थन, अमेरिका, ग्रीस आणि भारतातील जागतिक ज्युरीशी संवाद साधण्याची संधी मिळेल. संभाव्य करिअर संधींसाठी आंतरराष्ट्रीय स्टुडिओ, निर्माते आणि सरकारी अधिकाऱ्यांसह प्रमुख हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांना नेटवर्किंगच्या संधी देखील मिळतील. अॅनिमेशन स्टुडिओ आणि स्वतंत्र विकासकांना निधी, आयपी विकास आणि व्यवसाय वृद्धीबाबत मार्गदर्शन मिळेल.

विविध शहरांमधील निर्मात्यांना आगामी वेव्हज उत्कृष्टता पुरस्कारांमध्ये सहभागी व्हायला प्रेरित करण्यासाठी असिफा इंडियाने 15 भारतीय उप-विभागांमध्ये बैठकांच्या मालिकेचे आयोजन केले. 'डीप डाइव्ह इनटू एक्सलन्स फ्रॉम मेंटर्स' या सत्रात अमेरिकेतील ब्रायना यारहाऊस आणि ग्रीसमधील अथेन्स येथील डॉ. अनास्तासिया दिमित्रा यासारख्या प्रख्यात जागतिक ज्युरींनी सहभागींना टिप्स दिल्या.
अधिक माहितीसाठी आणि तुमचे काम सादर करण्यासाठी, सबमिशन पोर्टलला भेट द्या:
https://www.asifaindia.com/waoe/
असिफा इंडिया विषयी
असिफा इंडिया ही 2000 मध्ये भारतात व्हीएफएक्स, अॅनिमेशन आणि गेमिंगच्या कला, हस्तकला आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली एक ना-नफा ना तोटा तत्त्वावरील संस्था आहे.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102526)
Visitor Counter : 44