सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची पहिली बैठक
Posted On:
12 FEB 2025 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सुरु केलेल्या आणि सध्या सुरु असलेल्या उपाययोजना' या विषयावरील सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल आणि मुरलीधर मोहोळ, समितीचे सदस्य, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या समितीने सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून घेतलेले उपक्रम आणि सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेले प्रयत्न या संदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी एका स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि "सहकारातून समृद्धी"हा मंत्र दिला, असे अमित शाह यांनी या बैठकीला संबोधित करताना सांगितले.सहकाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागाची समृद्धी या दोन्ही गोष्टी साध्य होतील असा मोदी सरकारचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

प्राथमिक कृषी पतसंस्थांना व्यवहार्य बनवण्यासाठी आदर्श उपनियम तयार केले असून बहुतेक सर्व राज्यांनी ते स्वीकारले आहेत, असे शाह यांनी सांगितले. प्राथमिक कृषी पतसंस्थांना सामायिक सेवा केंद्र,जन औषधी केंद्र आणि इतर सेवांसारख्या 20 पेक्षा अधिक घडामोडींशी जोडले आहे, असे ते म्हणाले.

सहकार मंत्रालयाने "त्रिभुवन" सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याच्या उद्देशाने एक विधेयक सादर केले असून लवकरच ते संसदेत संमत होईल,असे अमित शाह यांनी सांगितले.या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे सहकार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यावसायिकांना तांत्रिक शिक्षण, लेखा,प्रशासकीय ज्ञान आणि प्रशिक्षण प्रदान केले जाईल. त्यामुळे सहकार क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

सहकार क्षेत्राला कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच समान संधी उपलब्ध व्हाव्यात हा सरकारचा प्रयत्न आहे.सहकार मंत्रालयाने वित्त मंत्रालय,रिझर्व्ह बँक आणि प्राप्तिकर विभागाच्या सहकार्याने कॉर्पोरेट आणि सहकार क्षेत्रांसाठी एकसमान कर रचना करण्यासाठी पावले उचलली आहेत, असे अमित शाह म्हणाले.
देशातील सहकारी संस्थांच्या विकासातील प्रादेशिक विषमता लक्षात घेऊन सर्व राज्यात एकसमान संतुलित विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष उपाययोजना करत आहे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत समितीच्या सदस्यांनी देशातील सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाशी निगडित मुद्द्यांवर आपले विचार मांडले आणि देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यासाठी सरकारने उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांची प्रशंसा केली.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102472)
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam