सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ 2025 : वसंत पंचमीच्या अमृत स्नानानंतर, 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजमधील गंगा पंडालमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 06 FEB 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025 

 

प्रयागराजमधील महाकुंभ 2025 निमित्त संस्कृती मंत्रालय गंगा पंडालमध्ये एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान देशभरातील प्रसिद्ध कलाकार संगीत, नृत्य आणि कलेच्या भव्य सादरीकरणातून भाविकांना मंत्रमुग्ध करतील.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतील 7 फेब्रुवारी रोजी सादर होणारा ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली यांचा नृत्याविष्कार; 8 फेब्रुवारी रोजी होणारे प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे सादरीकरण; 9 रोजी फेब्रुवारी होणारे सुरेश वाडकर आणि सोनल मानसिंग यांचे गायन; आणि 10 फेब्रुवारी रोजी होणारा प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा कार्यक्रम.

याशिवाय, विविध भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत परंपरेतील प्रमुख कलाकार आपल्या  सादरीकरणाने महाकुंभातील संध्याकाळ संगीतमय आणि श्रवणीय बनवतील.

गंगा पंडाल येथील सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेळापत्रक:

7 फेब्रुवारी :

  • डोना गांगुली (कोलकाता) - ओडिसी नृत्य
  • योगेश गंधर्व आणि आभा गंधर्व - सुफी गायन
  • सुमा सुधींद्र (कर्नाटक) - कर्नाटकी शास्त्रीय संगीत गायन
  • डॉ. देवकी नंदन शर्मा (मथुरा) - रासलीला

8 फेब्रुवारी :

  • कविता कृष्णमूर्ती आणि डॉ. एल. सुब्रमण्यम - सुगम संगीत
  • प्रीती पटेल (कोलकाता) - मणिपुरी नृत्य
  • नरेंद्र नाथ (पश्चिम बंगाल) - सरोद वादन
  • डॉ. देवकी नंदन शर्मा (मथुरा) - रासलीला

9 फेब्रुवारी:

  • सुरेश वाडेकर - सुगम संगीत
  • पद्मश्री मधुप मुद्गल (नवी दिल्ली) - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन 
  • सोनल मानसिंग (नवी दिल्ली) - ओडिसी नृत्य
  • डॉ. देवकी नंदन शर्मा (मथुरा) -  रासलीला

10 फेब्रुवारी:

  • हरिहरन – सुगम संगीत
  • शुभदा वराडकर (मुंबई) – ओडिसी नृत्य
  • सुधा (तामिळनाडू) – कर्नाटकी शास्त्रीय संगीत गायन 

महाकुंभ 2025 हा केवळ भक्ती आणि श्रद्धेचा भव्य उत्सव नाही तर तो भारतीय संस्कृती, संगीत, नृत्य आणि साहित्यासाठी एक जागतिक व्यासपीठ देखील आहे. गंगा पंडालमधील कार्यक्रम भाविकांसमोर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जिवंत रूप सादर करतील, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही स्वरूपात हा भव्य उत्सव अनुभवता येईल. 

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2100499) आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Bengali , Gujarati , Telugu , Malayalam