पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महामहीम प्रिन्स करीम आगाखान IV यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2025 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामहीम प्रिन्स करीम आगा खान IV यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी त्यांना एका दूरदर्शी नेत्याच्या रूपात गौरवले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवा आणि आध्यात्मिकतेसाठी समर्पित केले. तसेच, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः
"महामहीम प्रिन्स करीम आगा खान IV यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. ते एक दूरदृष्टी असणारे नेते होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा आणि आध्यात्मिकतेला समर्पित केले. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्याशी झालेल्या माझ्या संवादाच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबियांसह जगभरातील त्यांचे लाखो अनुयायी आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे"
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2100146)
आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam