राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धिपत्रक

Posted On: 31 JAN 2025 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2025

 

संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी केलेली  टिप्पणी उच्च पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहे आणि म्हणूनच  अस्वीकारार्ह  आहे. या नेत्यांनी म्हटले आहे की, अभिभाषणाच्या शेवटी शेवटी राष्ट्रपती खूपच  थकल्या होत्या आणि त्यांना बोलताना त्रास  होत होता.  

राष्ट्रपती भवन हे स्पष्ट करू इच्छिते  की सत्यापेक्षा अधिक महत्वाचे  काहीही असू शकत नाही. राष्ट्रपती  कोणत्याही क्षणी थकलेल्या नव्हत्या.  खरेतर, त्यांना  विश्वास आहे की उपेक्षित समुदायांसाठी, महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे, जसे त्या आपल्या भाषणादरम्यान करत होत्या, ते कधीही थकवणारे असूच शकत नाही. राष्ट्रपती कार्यालयाच्या मते असे होऊ शकते की हे नेते   हिंदीसारख्या भारतीय भाषेतील म्हणी आणि संभाषणाशी  परिचित नसावेत  आणि त्यामुळे चुकीची धारणा झाली.  कोणत्याही विषयासंदर्भात  अशा टिप्पण्या वाईट , दुर्दैवी आणि पूर्णपणे टाळण्यायोग्य आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2098192) Visitor Counter : 13


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil