राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या राष्ट्राला संबोधित करणार
Posted On:
24 JAN 2025 5:53PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (25 जानेवारी 2025) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
हे भाषण आकाशवाणीच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारित केले जाईल. दूरदर्शनवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील भाषणानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये हे भाषण प्रसारित केले जाईल. आकाशवाणी त्यांच्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर रात्री साडेनऊ वाजल्यापासून भाषणाच्या संबंधित प्रादेशिक भाषांमधल्या आवृत्ती प्रसारित करेल.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2095943)
Visitor Counter : 32