पंतप्रधान कार्यालय
कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची पंतप्रधानांनी केली घोषणा
Posted On:
22 JAN 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे:
"कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना.स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना मदत करत आहे."
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095154)
Visitor Counter : 19
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam