कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 22 JAN 2025 10:20AM by PIB Mumbai

भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात उपराष्ट्रपतींच्या हस्ते 'हमारा संविधान हमारा सन्मान' मोहिमेचा प्रारंरंभ करण्यात आला होता. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही या मोहिमेच्या माध्यमातून केले जात आहे. भारताच्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष आणि राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही मोहीम सुरू केली गेली होती.
आत्तापर्यंत या मोहिमेत लक्षणीय लोकसभाग सहभाग दिसून आला असून, या मोहीमेअंतर्गत MyGov या व्यासपीठावर 1.3 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उत्साहाने पंच प्रण विषयक शपथ घेत, राष्ट्र उभारणीप्रती आपली बांधिलकी दर्शविली आहे. ग्राम विधी चेतना उपक्रमांतर्गत देशभरातील विधी शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती उपक्रमही राबवले, या माध्यमातून त्यांनी 21000+ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत, प्रत्यक्ष जमीनीवर लोकसभाग मिळत राहील याचीही सुनिश्चिती केली. याव्यतिरिक्त न्याय विभागाने नारी भागीदारी आणि वंचित वर्ग सन्मान या उपक्रमांअंतर्गत दूरदर्शन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत (IGNOU) सहकार्यपूर्ण भागिदारी प्रभावी वेबिनारचे आयोजित केले होते. या माध्यमातून 70 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा सहभाग लाभला. यामुळे कायदेविषयक  आणि सामाजिक बाबींमध्ये महिलांचा सहभाग वाढायलाही मदत झाली. युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी नवभारत नवसंकल्प अभियानांतर्गत संवादी स्वरुपाच्या विविध  स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन दिले गेले तसेच त्यांच्यामध्ये उज्वल भविष्यासाठी जबाबदारीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला.
गेले वर्षभर सुरू असलेली ही मोहिम देशाच्या अनेक भागांपर्यंत पोहचली आहे. या वर्षभरात या मोहीेअंतर्गत बिकानेर (राजस्थान), प्रयागराज (उत्तर प्रदेश) आणि गुवाहाटी (आसाम) इथे प्रादेशिक कार्यक्रमांचेही आयोजन केले गेले. या उपक्रमांना सुमारे पाच हजारांपेक्षा जास्तत नागरिकांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर या अभियानाशी जोडलेल्या  सबको न्याय हर घर न्याय, नव भारत नव संकल्प आणि विधी जागृती अभियान यांसारख्या इतर उपक्रमांमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
आता या अभियानाअंतर्गत प्रयागराजमधील परमार्थ त्रिवेणी पुष्प, अरैल घाट इथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत या मोहिमेचे यश साजरे करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रमही आयोजित केले जाणार  आहेत. संगम नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  प्रयागराज इथे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक असा महाकुंभ मेळा सुरू आहे. इथे लाखो लोक गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी एकत्र येतात. अशा या महाकुंभाच्या निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे एक महत्वाची घडामोडच असणार आहे.  प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा सन्मान मोहिमेचा समारोप
होणार आहे, ही घटना म्हणजे सामाजिक अभिसारणाचे प्रतिक असलेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचे महत्व वाढवणारी घटना आहे. ही घटना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, आध्यात्मिक परंपरा आणि घटनात्मक मूल्यांच्या संगमाचे प्रतिक असणारी घटना ठरणा आहे.

***

JPS/TP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2095018) Visitor Counter : 27