पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेतील जाफना येथे भारताच्या मदतीने बांधलेल्या प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2025 9:14PM by PIB Mumbai
भारताच्या मदतीने श्रीलंकेतील जाफना येथे बांधलेल्या प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वागत केले.
X वरील इंडिया इन श्रीलंका हँडलच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
“जाफना येथे भारताच्या साहाय्याने उभारलेल्या प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे ‘थिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण केल्याचे स्वागत आहे. महान थिरुवल्लुवर यांना आदरांजली वाहण्याबरोबरच, भारत आणि श्रीलंकेतील लोकांमधील दृढ सांस्कृतिक, भाषिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांची यावरून साक्ष पटते.”
***
JPS/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2094182)
आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada