माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महाकुंभ 2025 : आकाशवाणीचे कुंभवाणी वार्तापत्र आता महाकुंभ नगर, प्रयागराज मधील सार्वजनिक संबोधन प्रणालीवर लाईव्ह उपलब्ध
सकाळी 8.30, दुपारी 2.30 आणि संध्याकाळी 8.30 वाजता असे दिवसातून तीन वेळा हे कुंभमेळ्यासाठी समर्पित बातमीपत्र मेळ्याच्या संकुलात प्रसारित होईल
कुंभ वार्तापत्रे न्यूजऑनएयर ऍप, वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि आकाशवाणीचे अधिकृत यूट्युब चॅनेल न्यूज ऑन एयर ऑफिशियलवर देखील उपलब्ध आहेत
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2025 5:58PM by PIB Mumbai
कुंभमेळ्यात येणारे भाविक आणि यात्रेकरू यांना माहिती उपलब्ध करून देत राहण्यासाठी आकाशवाणीची कुंभवाणी वार्तापत्रे आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ नगरमध्ये सार्वजनिक संबोधन प्रणालीवर थेट प्रसारित केली जात आहेत. पहिले कुंभवाणी वार्तापत्र आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता प्रसारित करण्यात आले.

कुंभवाणी वार्तापत्रे सकाळी 8.30 ते 8.40, दुपारी 2.30 ते 2.40 आणि संध्याकाळी 8.30 ते 8.40 अशी दिवसातून तीन वेळा प्रसारित केली जातील. ज्यामुळे महाकुंभ मेळ्यातील विविध घडामोडींची ताजी माहिती दिली जाईल. त्याशिवाय भाविकांना प्रयागराज येथील 103.5 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर कुंभवाणी वार्तापत्रे ऐकता येतील. ही समर्पित वार्तापत्रे न्यूजऑनएयर ऍप, वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि आकाशवाणीचे अधिकृत यूट्युब चॅनेल न्यूज ऑन एयर ऑफिशियलवर देखील उपलब्ध आहेत. या उपक्रमाला भाविक आणि यात्रेकरूंकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून महाकुंभची माहिती देण्यासाठी राबवण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल म्हणाले, “महाकुंभ हा एक भव्य आध्यात्मिक सामाजिक मेळा आहे आणि प्रसार भारती संपूर्णपणे विश्वासार्ह असलेल्या रियल टाईम बातम्या प्रसारित करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी समर्पित वार्ताहर, संपादक आणि वृत्तनिवेदक यांचा चमू प्रयागराज येथे महाकुंभाचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सातत्यपूर्ण प्रसारण करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2094143)
आगंतुक पटल : 79