पंतप्रधान कार्यालय
लष्करातील वरिष्ठ हवालदार बलदेव सिंग (निवृत्त) यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2025 10:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करातील वरिष्ठ हवालदार बलदेव सिंग (निवृत्त) यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भारतासाठी त्यांची अतुलनीय सेवा पुढील अनेक वर्षे आपल्या स्मरणात राहील असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. दृढनिश्चय आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या बलदेव सिंग यांची राष्ट्राप्रती असलेली अतूट निष्ठा आणि समर्पण भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असेही मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे;
“हवालदार बलदेव सिंग (निवृत्त) यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. भारताची त्यांनी केलेली अतुलनीय सेवा पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दृढनिश्चय आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक, असलेल्या बलदेव सिंग यांची राष्ट्राप्रती असलेली अतूट निष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. मला ते काही वर्षांपूर्वी नौशेरा येथे भेटल्याचे आठवते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.
***
SonalT/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2091400)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam