सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरातील सहकारी क्षेत्राला बळकट करण्यासाठी विविध उपक्रमांचे केले उद्घाटन

Posted On: 22 DEC 2024 7:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरातील सहकारी क्षेत्राला बळकट करण्यासाठी विविध उपक्रमांची सुरुवात केली. अमित शहा म्हणाले की, नाबार्डच्या माध्यमातून मोबाईल ग्रामीण मार्ट्स सुरू करण्यात आले असून या मार्ट्स त्रिपुराच्या पाच जिल्ह्यांतील लोकांना 'इंडिया ब्रँड'द्वारे स्वस्त दरात डाळी, तांदूळ आणि गहू पीठ उपलब्ध करून देतील. त्यांनी सांगितले की, त्रिपुरा राज्य सहकारी बँकेच्या 50 प्राथमिक सहकारी संस्थांना मायक्रो एटीएम देण्यात आले आहेत. आज त्रिपुरामध्ये सहकारी पेट्रोल पंप आणि धलाई जिल्ह्यात ग्राहक स्टोअरचे उद्घाटनही करण्यात आले आहे. शहा पुढे म्हणाले की, आज आठ उपक्रम राबविण्यात आले आहेत, ज्यामध्ये त्रिपुरा राज्य सहकारी संघाचा स्मार्ट प्रशिक्षण केंद्र, एनसीसीएफच्या माध्यमातून 500 शेतकऱ्यांना मिनी बीज किटचे वितरण, आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) व त्रिपुरा राज्य सेंद्रिय शेती विकास संस्था यांच्यात सामंजस्य कराराचा समावेश आहे.

सहकार मंत्र्यांनी नमूद केले की, त्रिपुरा पारंपरिकरित्या 70% पेक्षा अधिक सेंद्रीय उत्पादने तयार करणारे राज्य आहे. परंतु या उत्पादनांना प्रमाणपत्र नाही. त्यांनी सांगितले की त्रिपुरातील शेतकऱ्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून एनसीओएलशी जोडले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जमिनीला आणि उत्पादनांना प्रमाणपत्र मिळेल. शहा म्हणाले की, दोन ते तीन वर्षांच्या आत एनसीओएल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी किमान 30% अधिक दर मिळवून देईल.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की, त्रिपुरातील शेतकरी सहकाराच्या माध्यमातून स्वतःच्या व कुटुंबाच्या समृद्धीसाठी काम करू शकतात. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी जगातील सर्वात मोठी अन्नसाठा योजना सुरू केली असून, त्रिपुरामध्ये सहकारी तत्त्वावर 2000 मेट्रिक टन क्षमतेची गोदामे बांधली जातील. त्यांनी आश्वासन दिले की राज्यात एकही तालुका असा नसेन की जिथे साठवण सुविधा नसेल.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2087126) Visitor Counter : 11


Read this release in: English , Urdu , Bengali-TR