पंतप्रधान कार्यालय
प्रणव मुखर्जींसोबतचे माझे सहवासाचे क्षण मी नेहमीच जपून ठेवेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
11 DEC 2024 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2024
प्रणव मुखर्जी यांच्या सहवासाचे क्षण आपण नेहमीच जपून ठेवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्याशी झालेल्या संवादाच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जी यांचे आभार मानून पंतप्रधानांनी मुखर्जी यांच्या अद्वितीय अंतर्दृष्टीची आणि बुद्धीमत्तेची प्रशंसा केली.
मोदी स्टोरी हँडलच्या X या समाज माध्यमावरच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी लिहिले:
“प्रणव बाबूंसोबतच्या माझ्या संवादाच्या अनेक आठवणी परत जागवल्याबद्दल शर्मिष्ठाजींचे आभार. त्यांच्यासोबतचे माझ्या सहवासाचे क्षण मी नेहमीच जपून ठेवेन. त्याची अंतर्दृष्टी आणि बुद्धीमत्ता अतुलनीय आहे.
* * *
S.Tupe/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2083817)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam