पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात गुजराती गायक पुरुषोत्तम उपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
11 DEC 2024 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध गुजराती गायक पुरुषोत्तम उपाध्याय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
श्री मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले:
सुगम संगीताद्वारे गुजराती भाषा जगभर जिवंत ठेवणारे दिग्गज गायक पुरुषोत्तम उपाध्याय यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय धक्का बसला. कलाविश्वाची ही कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या सुमधुर आवाजातील स्वरांकण संगीत रचना सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील.
सद्गत आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना आणि शोकाकुल परिवाराप्रती संवेदना...
ॐ शांती 🙏”
* * *
S.Tupe/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083659)
Visitor Counter : 19
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam