केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2024 – लेखी परीक्षेचा निकाल

Posted On: 10 DEC 2024 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024


केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2024 च्या निकालाच्या आधारे, खाली दिलेल्या अनुक्रमांकाचे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवा (गट 'अ' आणि गट 'ब') निवडीकरता व्यक्तिमत्व चाचणीसाठी ( मुलाखत )पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांची उमेदवारी तात्पुरती असून ते सर्व बाबतीत पात्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या व्यक्तिमत्व चाचणीच्या वेळी (मुलाखत) त्यांच्या पात्रता/आरक्षण दाव्यांच्या समर्थनार्थ मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे उदा. वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता, समुदाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग, लक्षणीय दिव्यांग व्यक्ती (PwBD) आणि टी ए फॉर्म इ. इतर कागदपत्रे. त्यामुळे उमेदवारांनी ही कागदपत्रे आपल्याजवळ तयार ठेवावीत. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / लक्षणीय दिव्यांग व्यक्ती / माजी सैनिक इत्यादींसाठी आरक्षण/ सवलत  लाभ मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा  2024 च्या अर्जाच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 06.03.2024  जारी केलेले मूळ प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे.

या उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) च्या तारखा योग्य वेळी सूचित केल्या जातील, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-110069 येथील कार्यालयात मुलाखती  आयोजित केल्या जातील. त्यानुसार व्यक्तिमत्व चाचण्यांचे (मुलाखती) वेळापत्रक जाहीर केले जाईल. उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचणीचे ई-समन पत्र (मुलाखती) योग्य वेळी उपलब्ध करून दिले जातील, ते आयोगाच्या https://www.upsc.gov.in आणि https://www.upsconline या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. ज्या उमेदवारांना त्यांची ई-समन्स पत्रे डाउनलोड करता येणार नाहीत, त्यांनी आयोगाच्या कार्यालयाशी पत्राद्वारे किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23381125, 011-23098543 किंवा फॅक्स क्रमांक 011-23387310, 011-23384472 किंवा ईमेलद्वारे वर (csm-upsc[at]nic[dot]in). वर संपर्क साधावा. आयोगाकडून व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) साठी कोणतेही कागद स्वरूपात  समन पत्र जारी केले जाणार नाहीत.

उमेदवारांना सूचित केलेल्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) ची तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती सामान्यतः स्वीकारली जाणार नाही.

व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती)साठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचा अर्ज-II (DAF-II) तपशीलवार भरणे आणि सादर करणे अनिवार्य आहे.

याबाबत, नागरी सेवा परीक्षा, 2024 नियमांमध्ये खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत:

परीक्षेसाठी  मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी सुरू होण्यापूर्वी, उमेदवाराने अनिवार्यपणे केवळ त्या सेवांसाठी प्राधान्यक्रम सूचित करणे आवश्यक आहे जे प्राधान्यक्रम नागरी सेवा परीक्षा-2024 मध्ये भाग घेत आहेत आणि  अंतिम निवडीच्या बाबतीत, ऑनलाइन तपशीलवार अर्ज-II (DAF-II) मध्ये वाटप करण्यास उमेदवार इच्छुक आहे.

ओबीसी  परिशिष्ट  (केवळ ओबीसी  श्रेणीसाठी) आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिशिष्ट (केवळ ई डब्लू एस  श्रेणीसाठी) अनिवार्यपणे सादर  करणे आवश्यक आहे. DAF-II किंवा समर्थनातील कागदपत्रे विहित तारखेनंतर सादर करण्यात आलेल्या कोणत्याही विलंबाला परवानगी दिली जाणार नाही आणि त्याअभावी  CSE-2024 साठी उमेदवारी रद्द केली जाईल. उमेदवार त्यांच्या उच्च शिक्षणाचे अतिरिक्त दस्तऐवज/प्रमाणपत्रे, विविध क्षेत्रातील कामगिरी, सेवा अनुभव इ. अपलोड करू शकतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे सेवा वाटपासाठी उमेदवारीची शिफारस केल्यास, इतर अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून ऑन-लाइन तपशीलवार अर्ज फॉर्म-II मध्ये उमेदवाराने प्राधान्य दर्शविल्यापैकी एका सेवेसाठी उमेदवाराचा विचार केला जाईल. उमेदवाराने एकदा सादर केल्यानंतर सेवांसाठी प्राधान्यांमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही सेवेसाठी प्राधान्य न दिल्यास, सेवा वाटपासाठी उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.

भारतीय प्रशासकीय सेवेसाठी किंवा भारतीय पोलिस सेवेसाठी आपला विचार व्हावा अशी इच्छा असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन तपशीलवार अर्ज-II मध्ये विविध झोन आणि कॅडरसाठी प्राधान्यांचा क्रम सूचित करणे आवश्यक आहे ज्यासाठी उमेदवाराला आयएएस किंवा आयपीएसमध्ये नियुक्ती झाल्यास त्यातील वितरणासाठी त्याचा विचार व्हावा असे वाटत असेल. झोन आणि कॅडरसाठी एकदा प्राधान्यक्रम सादर केल्यानंतर दुसऱ्यांदा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायची अनुमती दिली जाणार नाही.

टीप-I – उमेदवारांना असा सल्ला देण्यात येत आहे की विविध सेवा आणि पदे यांसाठी प्राधान्यक्रम अतिशय काळजीपूर्वक सूचित करावेत. या संदर्भात नियम 21(1) कडे देखील लक्ष वेधण्यात येत आहे.

टीप-II : सेवा वाटप, संवर्ग वाटप इत्यादींबद्दल माहिती किंवा तपशिलांसाठी उमेदवारांना वेळोवेळी DoPT च्या https://dopt.gov.in किंवा https://cseplus.nic.in या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जात आहे.

Note-III : नागरी सेवा परीक्षा-2024 साठी लागू असलेल्या केडर वितरण धोरणानुसार ज्या उमेदवारांना आयएएस/आयपीएस मधील सेवा पसंती सूचित करायची आहे त्यांना असा सल्ला दिला जात आहे की त्यांनी त्यांच्या ऑनलाईन तपशीलवार अर्ज-II मध्ये पसंतीच्या क्रमामध्ये सर्व झोन्स आणि केडर सूचित करावेत.

म्हणून, परीक्षेच्या नियमांच्या उपरोल्लेखित तरतुदींनुसार, या सर्व उमेदवारांना फक्त ऑनलाईन तपशीलवार अर्ज- DAF-II ऑनलाइन भरावे लागतील आणि सादर करावे लागतील, जे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर (https://upsconline. nic.in) 13 डिसेंबर, 2024 ते 19 डिसेंबर, 2024 या कालावधीत संध्याकाळी 6:00 पर्यंत उपलब्ध असतील. तसे न केल्यास त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात आयोगाकडून कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. शिवाय, अशा उमेदवारांना कोणतेही ई-समन्स लेटर जारी केले जाणार नाही.

DAF-I आणि DAF-II मध्ये दिलेल्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल/सुधारणा करण्याची विनंती आयोगाकडून मान्य केली जाणार नाही. मात्र, जिथे आवश्यकता असेल तिथे उमेदवारांना त्यांच्या केवळ पत्त्यामध्ये/ संपर्क तपशीलात काही बदल असल्यास त्याची माहिती आयोगाला ताबडतोब पत्र, ई-मेल(csm-upsc[at]nic[dot]in) किंवा फॅक्सद्वारे परिच्छेद 3 मध्ये नमूद केलेल्या क्रमांकावर हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत कळवावे असा सल्ला दिला जात आहे.

पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी सांक्षाकन अर्ज ऑनलाईन भरण्याची आणि ते ऑनलाईन सादर करण्याची गरज आहे जे  कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वेबसाईटवर व्यक्तिमत्व चाचणीच्या(मुलाखत) प्रारंभाच्या तारखेपासून ते व्यक्तिमत्व चाचण्या(मुलाखत) संपेपर्यंत  https://cseplus.nic.in/Account/Login या लिंकवर उपलब्ध केले जातील. म्हणूनच व्यक्तिमत्व चाचणीसाठी(मुलाखतीसाठी) पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी विहित कालमर्यादेत अर्ज भरावा असा सल्ला दिला जात आहे. साक्षांकन अर्जासंदर्भात कोणताही प्रश्न/ स्पष्टीकरणासाठी उमेदवारांनी कार्मिक व प्रशिक्षण विभागासोबत doais1[at]nic[dot]in, usais-dopt[at]nic[dot]in या ई-मेलवर किंवा 011-23092695/23040335/ 23040332 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

उमेदवारांच्या गुणपत्रिका अंतिम निकाल( व्यक्तीमत्व चाचण्या( मुलाखती) घेतल्यावर) जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केल्या जातील आणि त्या वेबसाईटवर 30 दिवस उपलब्ध असतील.  

निकाल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

S.Kane/B.Sontakke/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2082785) Visitor Counter : 28