पंतप्रधान कार्यालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले विनम्र अभिवादन
Posted On:
06 DEC 2024 1:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस.समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे,असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले;
"आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण प्रणाम करुन या!
समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी,डॉ.आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना आजही प्रेरणा देत आहे.आज, त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत असताना,आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.
या वर्षाच्या आरंभी मुंबईतील चैत्यभूमीला दिलेल्या माझ्या भेटीचे एक छायाचित्र देखील मी सामाईक करत आहे.
जय भीम!”
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081429)
Visitor Counter : 40
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam