पंतप्रधान कार्यालय
देशभरातील आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे : पंतप्रधान
Posted On:
03 DEC 2024 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त लिहिलेली पोस्ट सामाईक केली.
आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त स्वतः लिहिलेली पोस्ट सामाईक करत देशभरातील आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
एक्सवरील पोस्ट मध्ये ते लिहितात :
"देशभरातील आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आमचे सरकार संकल्पबद्ध आहे. मागील 10 वर्षांमध्ये आम्ही त्यांच्यासाठी जी धोरणे आखली आणि निर्णय घेतले ते याचा प्रत्यक्ष दाखला आहेत. आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी त्यांना समर्पित माझे काही शब्द…"
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2080390)
Visitor Counter : 25