आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी मध्य प्रदेशातील इंदौर  येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत जागतिक एड्स दिन 2024 कार्यक्रमाचे केले उद्घाटन

Posted On: 01 DEC 2024 4:43PM by PIB Mumbai

 

जागतिक एड्स दिनानिमित्त, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज मध्य प्रदेशातील इंदौर येथील देवी अहिल्या विद्यापीठाच्या सभागृहात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या उपस्थितीत जागतिक एड्स दिन 2024 निमित्त आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वर्षीची संकल्पना, “अधिकारांचा मार्ग घ्या” अशी असून यामध्ये सर्वांसाठी विशेषत: एचआयव्ही/एड्स ग्रस्तसाठी समान हक्क, सन्मान आणि आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

जागतिक एड्स दिन 2024 च्या 'अधिकाराचा मार्ग घ्या' संकल्पनेला अनुसरून, जेपी नड्डा यांनी एचआयव्ही/एड्स ग्रस्त लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, कायदेशीर संरक्षण, आरोग्यसेवा प्रवेश आणि सामाजिक बदल यावर भर देण्याप्रति केंद्र  सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली . ते म्हणाले, “जागतिक एड्स दिन हा एक क्षण आहे जो आपल्याला आठवण करून देतो की  आपण सर्वजण एड्सविरुद्धच्या लढाईत एकत्र आहोत.  तसेच या आजाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांच्या प्रयत्नांची आठवण ठेवण्याचा देखील हा क्षण असल्याचे ते म्हणाले."

केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय एड्स आणि एसटीडी नियंत्रण कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याचा उल्लेख करून एचआयव्ही/एड्सचा सामना करण्यासाठी सरकारच्या अतूट  दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी एनएसीओ -NACO आणि राज्य एड्स नियंत्रण संस्थांच्या  सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित केले ज्यामुळे भारतात 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये नवीन संसर्गासह  एचआयव्ही महामारीचे प्रमाण जवळपास ४४ % ने कमी झाले  आणि एड्सशी संबंधित मृत्यू 79% नी कमी झाले.

अत्यंत काळजी आणि समर्पणाने अशा आजारांना हाताळल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना नड्डा यांनी नमूद केले की ते नेहमीच संक्रमित लोकांच्या संपर्कात असूनही त्यांचे कार्य सुरू ठेवतात. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याप्रति भारत सरकारची वचनबद्धता अधोरेखित करताना नड्डा म्हणाले की, 2010 पासून भारतात नवीन एचआयव्ही रुग्णांची संख्या 44% ने कमी झाली आहे जी जागतिक स्तरावरील 39% च्या घट दरापेक्षा जास्त आहे. एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही 79% घट झाली आहे.

***

S.Kane/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079542) Visitor Counter : 56