संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दरम्यान भारतीय नौदलासाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणालीचे संरचनात्मक आरेखन/डिझाईन आणि विकासासाठीच्या सहकार्य विषयक आशयपत्रावर स्वाक्षऱ्या

Posted On: 29 NOV 2024 11:22AM by PIB Mumbai

 

भारत आणि ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणालीचे संरचनात्मक आरेखन/डिझाईन आणि विकासासाठीच्या सहकार्य विषयक आशयपत्र केले आहे. गुरूवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी पोर्ट्समाऊथ इथे या आशयपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

हे आशयपत्र इलेक्ट्रिक प्रोपल्शन क्षमता विषयक  भागिदारीच्या तिसऱ्या संयुक्त कार्यकारी गटाच्या बैठकीचा भाग म्हणून केले गेले. हे आशयपत्र म्हणदे विशिष्ट प्रकारचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याकरता प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचेच प्रतीक आहे.

सहकार्य विषयक आशयपत्र हे भविष्यात नौदलाच्या जहाजांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन क्षमता विषयक प्रणालीचे परस्पर भागिदारी संरचनात्मक आरेखन, सह-निर्मिती आणि सह-उत्पादन प्रक्रियेतील सहकार्यासाठी एक व्यापक आराखडा म्हणून कामी येणार आहे. भारतीय जहाज तळावर उभारल्या जाणार असलेल्या, जहाजे थांबण्याच्या फलाट व्यवस्थेच्या ठिकाणी पूर्णतः इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली स्थापित करण्याचे नियोजन भारतीय नौदलाने केले आहे.

या सहकार्य विषयक आशयपत्रावर भारताच्या वतीने नौदलाच्या नौदल प्रणाली विभागाचे (Naval Systems) संयुक्त सचिव राजीव प्रकाश आणि ब्रिटनच्या वतीने त्यांच्या संरक्षण मंत्रालयाच्या जहाज कार्यान्वयन आणि क्षमता विषयक एकात्मिकीकरण विभागाचे (Ships Operations & Capability Integration) संचालक रिअर अॅडमिरल स्टीव्ह मॅकार्थी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आशयपत्र प्रतिंचे परस्पर हस्तांतरण केले.

***

H.Akude/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079326) Visitor Counter : 25