पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रातील गोंदिया बस अपघातातल्या जीवित हानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मदत निधीतून सहाय्य जाहीर
Posted On:
29 NOV 2024 4:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील गोंदिया येथील बस अपघातामधल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट सामायिक केली:
"महाराष्ट्रातील गोंदिया इथल्या बस अपघातातल्या मृत्युंमुळे व्यथित झालो. ज्या लोकांनी आप्तस्वकीय गमावले, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. अपघातातील जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल . प्रधानमंत्री @narendramodi.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079245)
Visitor Counter : 6